Ticker

6/recent/ticker-posts

य. च. कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल


मंगरूळपीर, दि. २ (सुधाकर चौधरी) : स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यावर्षीही महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेषतः विज्ञान शाखेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ९७ टक्के निकाल नोंदविला आहे, तर कला शाखेचा निकाल ७१ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेत एकूण १०७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत ६८ विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेत वेदांत पंकज महल्ले प्रथम, स्वप्नील सुनील देशमुख द्वितीय तर हर्षद योगेश जाधव तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कला शाखेत कु. साक्षी सुरेश पाकधने हिने प्रथम क्रमांक पटकावला असून कु. सलोनी रमेश गायकवाड द्वितीय तर कु. आचल राजेश डोके तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. सुभाषराव ठाकरे व सचिव मा. चंद्रकांत ठाकरे यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. साहेबराव गावंडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याशिवाय सर्व शिक्षकवृंदांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशात मोलाचे योगदान दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments