Ticker

6/recent/ticker-posts

चाकातीर्थ येथील दुहेरी हत्याकांडातील फरार मुख्य आरोपीस डव्हा शेतशिवारातून अटक.


समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर आहे. लहान मुले, महिला व जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्कपणे उपाययोजना राबविल्या जातात व घडलेल्या गुन्ह्याच्या तपासास प्राधान्य दिले जाते. याच पार्श्वभूमीवर मौजे डव्हा येथील चाकातीर्थ येथे घडलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीस जेरबंद करण्यात पो.स्टे. जऊळका येथील पथक यशस्वी झाले आहे.

दि.१९.०९.२०२१ रोजी मालेगाव तालुक्यातील मौजे डव्हा येथील चाकातीर्थ येथे दोन वृद्ध पती पत्नीचा खून करण्यात आला होता. सदर प्रकरणी पो.स्टे. जऊळका येथे अप.क्र.३४१/२१ कलम ३०२, ३४ भादंवि. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. वृद्ध दाम्पत्याच्या निघृण अश्या या दुहेरी हत्याकांडाने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी पुरेशे सबळ पुरावे मिळून आलेले नसतांना पोलीस पथकाने आपले कसब पणाला लावून तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. संबंधित प्रकरणी तपासचक्रे वेगाने फिरवत ०२ आरोपींना अटक करण्यात आली होती. सदर हत्याकांडात अजूनही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास करण्यात येऊन सदर प्रकरणातील मुख्य आरोपी नामे सुनील जयराम खरात, वय ३५ वर्षे, रा. डव्हा, ता. मालेगाव, जिल्हा. वाशिम हा हत्याकांडापासून फरार होता व आपली ओळख लपवून राहत होता. वाशिम जिल्हा पोलीस दलामार्फत त्यास शोधण्याचे अथक प्रयत्न करूनही तो मिळून येत नव्हता. आज गुप्त बातमीदाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपीस आज डव्हा शेतशिवारातून पो.स्टे. जऊळका येथील तपास पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. जऊळका येथील ठाणेदार सपोनि. अजिनाथ मोरे, पोउपनि पाटील, पोउपनि गोरे, नापोकॉ.१२४४ काळदाते, चानापोकॉ, ७९८ काटेकर, पोकॉ.१२१९ कावरखे, पोकॉ. १२३ भूरकाडे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments