ओम बिर्ला यांनी शेवाळे यांची गटनेतेपदी आणि भावना गवळी यांच्या प्रतोदपदाला मान्यता दिल्यामुळे शिवसेनेचे उरलेले 6 खासदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापुढे लोकसभेत भावना गवळी यांचा व्हिप शिवसेनेच्या या 6 खासदारांना मान्य करावा लागणार आहे. खासदार गवळी यांनी काढलेला व्हिप मान्य केला नाही तर त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्येही यावर भाष्य केलं होतं. शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांना आमचा व्हिप मान्य करावा लागेल, असं सांगत शिंदे यांनी एकप्रकारे इतर सहा खासदारांना इशाराच दिला होता.
तसेच, लोकसभेत शिवसेनेचा गटनेता बदलल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. लोकशाहीत त्यांना तो अधिकार आहे असे सांगताना शिंदे यांनी केंद्रीय मंत्रीपदावर दावा सांगण्याबाबत आता काही बोलणार नाही असी भूमिका घेतली. शिवसेनेच्या खासदारांनी केवळ लोकसभेतील गटनेते बहुमताने बदलले आहेत. पक्षाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद भावना गवळी याच असून सेनेच्या साऱ्या खासदारांवर त्यांचा निर्णय बंधनकारक राहील, असाही इशारा मुख्यमंत्र्यांनी उर्वरीत 6 खासदारांना दिला.
शिंदे गटासोबत कोणते 12 खासदार
सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, राजेंद्र गावित, संजय मंडलिक, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, कृपाल तुमाने आणि भावना गवळी
शिवसेनेसोबत राहिलेले खासदार
विनायक राऊत, अरविंद सावंत, गजानन किर्तीकर, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, राजन विचारे आणि कलाबेन डेलकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला नाही.
0 Comments