"दिनांक 19/07/2022 रोगी मा. जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम श्री बच्चन सिंह साहेब यांचे मार्गदर्शनात व अप्पर पोलीस अधिक्षक वाशिम श्री गोरख भामरे साहेब यांचे अध्यक्षतेखाली पोलीस अधिक्षक कार्यालय वाशिम येथे जिल्हा स्कूलबस सुरक्षा समितीची महत्वाची बैठक पार पडली यामध्ये मा. उप-प्रादेशिक परीवहन अधिकारी वाशिम श्री ज्ञानेश्वर हिरडे यांनी समितीचे सचिव या नात्याने बैठकीचे संचालन केले बैठकीस उपप्रादेशिक परीवहन कार्यालयातील इतर अधिकारी, शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परीषद वाशिम जिल्हयातील सर्व नगरपालीका यांचेधकारी, विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ वाशिम जिल्हयातील सर्व तालुक्याचे एका शाळेतून नेमण्यात आलेले तालुका प्रतिनिधी, पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतुक शाखा वाशिम, पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, वाशिम हे बेठकीस हजर होते.
बैठकीमध्ये शालेय विद्यार्थ्याच्या स्कुलबस मधुन ने-आण करण्याच्या साचत सुरक्षीततेचे दृष्टीने उपाय योजनांची चर्चा करण्यात आली. त्यामध्ये स्कुल बस प्रवासी संघटनेचे प्रतिनीधी व स्कुलबस चालक यांना बोलावून
मार्गदर्शन करणे स्कुलबसची परीवहन विभागाकडून यांत्रीक तपासणी करून घेणे, परीवहन समितीची नियमीत सभा येणे त्यामध्ये सदर समितीचे सदस्य वरील प्रमाणे पालक व शिक्षक संघाचा प्रतिनिधी, संबंधीत क्षेत्राचे वाहतूक पोलीस निरीक्षक, परिवहन निरीक्षक, वाहतूक कंत्राटदार, स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांचा समावेश करून त्यामध्ये त्यांना येणा-या अडचणी कशा पध्दतीने सोडविता येतील समन्वयातून उपाययोजना करणे
जिल्हयातील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या ने-आण बाबत शिक्षक वाहतूक संघटनेचे प्रतिनीधी पालकांचे
प्रतिनीधी वाहतूक पोलीस निरीक्षक, परीवहन अधिकारी यांची कार्यशाळा आयोजीत करून प्रत्येक विभागाकडून
आपणास सोपविण्यात आलेल्या कामाबद्दल माहीती देणे,
जिल्हा स्तरावर, तालुका स्तरांवर स्कुल बसविषयी जनजागृती कार्यक्रम राबविणे यामध्ये शिक्षण विभाग, पोलीस विभाग व परिवहन विभाग यांचा सामुदायीक सहभाग असणे आवश्यक आहे. टाटा मैजिक, महींद्रा मक्झीमो अशा वाहनांतून विद्यार्थ्यांची ने-आण होवु नये म्हणून पोलीस विभागाकडुन योग्य ती कायदेशिर कार्यवाही करणे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परीषद, तसेच स्थानिक प्राधिकरणाकडुन त्यांच्या हद्दीतील शाळांसमोर
वाहतूक चिन्हे, स्कुलबस थांबे, स्पीड ब्रेकर अशा सुविधा पोलीस विभाग व परीवहन विभाग यांच्या समन्वयातून निर्माण करणे. महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाचे अधिकारी यांनी कोबीड-19 मध्ये व एसटी संपानंतर बंद असलेल्या मार्गावरील वाहतुकीची पाहणी करून ग्रामिण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहचविण्याच्या दृष्टीने बसेस फे.
वगैरे विषयांवर चर्चा झाली प्रत्येक विभागाच्या अधिका-यांनी त्याच्या कामाचे स्वरुप सांगुन त्यामधील सध्यस्थितीबाबत व पुढे करावयाच्या उपाययोजना व अडचणी याबाबत माहीती सांगितली. आज रोजीच्या बैठकीमध्ये पुढे चर्चेला आलेल्या विषयाबाबत अधिक गतीने काम करून पुढील बैठकीच्यावेळी त्याबाबतचे प्रगती अहवाल जिल्हा स्कूलबस सुरक्षा समितीचे अध्यक्ष मा. पोलीस अधिक्षक साहेब व सचिव मा. उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांचे समक्ष सादर करावयाचे आहे.
0 Comments