कांबळेकृत त्या " वीस कलमी " मध्ये
दिसते भाजपचे प्रतिबिंब
------------------------------
( सुधाकर चौधरी संपादक )
राजकीय पक्षांमधिल रोज सुरू असलेली चढाओढ , गदारोळ बघता
सामान्य माणूस भांबावून जात नसेल तर ते एक प्रकारचे नवलच म्हणावे लागेल . एवढा या राजकीय पक्षांच्या हैदोसाचा अगदी वैताग आलाय .अशा पार्श्वभूमीवर राजकारणावर सडेतोड भाष्य करणारा व त्याव्दारे जनतेचे विचारचक्र गतिमान करणारा " दीडशेपार संख्याबळाचा जनमार्ग " या शिर्षकाचा एक लेख राजकीय विश्लेषक व सामाजिक कार्यकर्ते गंगाधर कांबळे यांनी लिहूण त्याव्दारे सामान्य माणूस व राजकीय पक्ष यांच्यातील वास्तविकता विषद केली . कोणत्यातरी एकाच राजकीय पक्षाकडे स्पष्ट बहुमताची एकहाती सत्ता दिल्याशिवाय राज्याचा आणि जनतेचा विकास होणे नाही . असा श्री. कांबळे यांच्या लेखाचा रोख होता . यामध्ये त्यांनी विशिष्ट अशा कोणत्याही पक्षाचा कैवार न घेता व एकारलेपणा न दाखवता जनतेने आपल्या पसंतीच्या राजकीय पक्षाची निवड कोणत्या कसोटीवर करावी व त्या पक्षापाठी आपली ताकद उभी करावी यासाठी , १) घराणेशाहीला विरोध , कतृत्वाला प्रोत्साहन . , २) प्रखर राष्ट्रनिष्ठा बाळगणारा दृष्टीकोन . , ३)भ्रष्टाचारावर अंकुश . , ४) स्वच्छ व पारदर्शक कारभार . , ५) शेतकरी , महिला , दलित , आदिवासी व समस्त उपेक्षित घटक यांच्या शाश्वत विकासाचा अविरत ध्यास . , ६) समतोल सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ., ७) युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर . , ८) ग्रामीण समस्यांची सोडवणूक . , ९) शहरी व ग्रामीण भागातील बेघरांना घरे देण्यास प्राधान्य . , १०) पक्षीय चारित्र्य निष्कलंक ठेवण्याविषयीची अतिदक्षता . , ११) प्रशिक्षित कार्यकर्त्यांमार्फ जनकल्याणाची कामे मार्गी लावणारी पक्षीय शिस्तप्रियता . , १२) त्याग , निष्ठा , समर्पण या त्रयींची नेते व कार्यकर्ते यांना शिकवण देण्याची व्यवस्था . , १३) आपल्या कट्टर विरोधकांशीही सोहार्दपूर्ण व सभ्यतापूर्वक वर्तणूक . , १४) मतदारांना गृहीत न धरता त्यांनी दिलेला कौल किंवा त्यांना अपेक्षित असलेले काही फेरबदल मान्य करणारी खिलाडूवृत्ती . , १५) सुमार नेतृत्व क्षमता असलेल्यांच्या अनाठायी महत्वाकांक्षेला चाप . , १६) राडा प्रवृत्तीव्दारे होणाऱ्या विकृत शक्तीप्रदर्शनाला लगाम . , १७) राष्ट्रीयत्व जोपासणाऱ्या विचारसरणीचा पुरस्कार ., १८) सर्व धर्मिय लोकांच्या धार्मिक आस्थेचा आदर . , १९) निवडक अशा घटक समूहाच्या लांगूलचालनाला बगल . , २० ) धृवीकरणविरहीत सामाजिक अभियांत्रिकीची जूळवणी . या सशक्त अशा वीस कलमांचा ( मुद्यांचा ) एक खजिनाच जनतेसमोर ठेवून आपणच ( जनतेने ) सखोल विचारांती निर्णय घ्यावा असे आवाहनवजा सूचित केले .
गंगाधर कांबळे यांनी आपल्या या लेखामध्ये निरपेक्षपणे पक्ष निवडीचे स्वातंत्र्य , अधिकार जनतेला बहाल केले असले तरीही राजकीय पक्षांचा चांगुलपणा स्पष्ट करणारी सदरील वीस कलमे ( मुद्ये ) ही भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात लागू पडतात असे जाणकार मंडळींकडून सांगितल्या जात आहे . याबाबत ही जाणकार मंडळी असा दाखला देत आहेत की , महाराष्ट्रात सध्या शंभरीपार ( आमदारसंख्या ) असलेला एकमेव राजकीय पक्ष हा फक्त भाजपच असल्यामुळे त्याला दीडशेपारचा आकडा ओलांडणे फारसे कठीण नाही . तसेच पार्टी विथ डिफरन्स म्हणूनही भाजपची सर्वदूर ख्याती आहे असा तर्क ( लाॅजिक ) हे जाणकार लावतात . अनुशासन ( डीशीप्लान ) च्या बाबतीतही भाजप आघाडीवर असतो . कांबळे यांनी आपल्या लेखामध्ये जी " वीस कलमी " दाखवून दिली आहे त्यामुळे त्यात सर्वाधिक भाजपचेच प्रतिबिंब दिसते अशी स्पष्ट कबुली अनेक जाणकार देऊ लागले आहेत . गंगाधर कांबळे यांनी हा विषय कळीचा बनवून अनेकांना याबाबत चर्चेसाठी प्रवृत्त करून एकप्रकारे भाजपचे काम अधिक सोपे केले . तर अन्य राजकीय पक्षांचा या " वीस कलमी " संदर्भात दुरान्वयाने काडीचा सुध्दा संबंध येत नाही .या कलमागणिक भाजपचीच छबी हुबेहूब दिसते . त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी या वीस कलमीमुळे जनतेचा कल भाजपकडे वळण्यास मदत होऊ शकेल
एवढे मात्र नक्की .
0 Comments