वाशिम रायगड पुणे माणगाव दरम्यानच्या ताम्हनी घाटात शनिवारी 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता च्या सुमारास पुण्याहून माणगाव कडे येणारी स्विफ्ट डिझायर कार घाटातील कोंडेधर घाटातून ४०० फूट कठड्यावरून खाली दरीत कोसळली असून अपघातात कार मधील ३ युवक जागीच ठार तर ३ गंभीर जखमी झाले कारचा चुराडा झाला आहे.
सदर अपघाताबाबत अधिकृत अशी की वाशिम येथून आलेल्या स्विफ्ट कार मध्ये एकूण सहा युवक होते ते कोकणात पर्यटनासाठी आले होते ते पुन्हा आपल्या गावी वाशीमला परत जात असताना त्यांची गाडी ताम्हणी घाटात आली असताना वळणावर त्यांची कार कठड्या वरून चारशे फूट दरीत कोसळली या अपघाताची माहिती समजतात माणगाव पोलिसासह साळुंखे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला.
कार मध्ये मयत झालेले युवक व जखमी युवक अडकून पडले होते त्यांना पोलिसांनी साळुंखे रेस्क्यू टीमच्या साह्याने बाहेर काढले मृत्यू पावलेल्या तीन व जखमींना बानगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले या अपघातात कृष्णा पंडित राठोड वृषभ चव्हाण सौरभ भिंगे हे ३ युवक यांचा जागेवरच मृत्यू झाला तर ३ रोहन गाडे परविन सरकटे, रोशन चव्हाण हे तीन जण जखमी झाले जखमेवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषध उपचार करण्यात आला असून या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
0 Comments