Ticker

6/recent/ticker-posts

दीडशेपार संख्याबळाचा जनमार्ग . ----------------------------------------

वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे          संपादक सुधाकर चौधरी

           २८८ आमदारसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्या तिन दशकांपासून आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत घेत एकहाती सत्ता मिळवता आलेली नाही . दोन किंवा त्यापेक्षा अधिक पक्ष एकत्र येऊनच सत्ता स्थापनेचे सतत वेगवेगळे प्रयोग करावे लागलेत  ते आजसुद्धा थांबलेले नाहीत . यालाच मग पुढे युती , आघाडी , महविकास आघाडी अशा विविध गोंडस नावाचा मुलामा द्यावा लागला . आतातर  याला याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही , अशी पक्की धारणा करून  घेतली असल्याचे चित्र उभे केल्याची प्रचीती येत आहे . नाही म्हटले तरी जनतेला राजकीय पक्षांच्या असल्या वाटचालीचा कंटाळा आलेला आहे . सत्ताप्राप्तीच्या लोभापायी कोणता राजकीय पक्ष कोणत्यावेळी संधीसाधूपणाची भूमिका घेईल आणि  सत्तांतराची समिकरणे नेमकी  कशाप्रकारे  बदलतील याविषयी ठोसपणे  काही सांगता येणे कठीण झाले आहे . राजकीय पक्षांनी ओढवून घेतलेली ही अगतिकता राज्य आणि जनतेच्या हिताच्या दृष्टीने मात्र हानीकारक अशीच आहे . सर्वसामान्य लोकांना अस्थिर सत्तांतरांच्या दुष्परिणामांना वारंवार सामोरे जावे लागत असेल तर त्याच्या बदलाच्या प्रक्रियेसाठी सामूहिक पुढाकार घेतल्याशिवाय जमणार नाही . जनतेतून तशा हलचालींचे  स्पष्ट संकेत जाणवू सुध्दा लागले आहेत .  " सगळेच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी " ही सार्वत्रिक तयार झालेली लोक धारणा चूकीची नसली तरीही यामध्ये  अजिबात सुधारणा होणार नाही असे थोडेच आहे ? राजकीय पक्षांच्या बऱ्या - वाईटाचा विचार करायचा झाल्यास त्याबाबत सकारात्मक व प्रचंड आशावादी दृष्टीकोन बाळगूनच प्रयत्नांची पराकाष्ठा करता येण्यासाठी काही तरी नविन्यपुर्ण पवित्रा शोधण्याचा विचार करणे भाग आहे .त्या दिशेने पहिले पाऊल टाकता येऊ शकणारा उपायअसा असू शकेल त्या अनुषंगाने ध्यानात घेण्याजोगे   काही मुद्ये अशास्वरूपाचे  सांगता येतील -- 
२) प्रखर राष्ट्रनिष्ठा बाळगणारा दृष्टीकोन .
४) स्वच्छ व पारदर्शक कारभार .
६) समतोल सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा  प्रामाणिक प्रयत्न . 
८) ग्रामीण समस्यांची सोडवणूक .
१०) प्रशिक्षित कार्यकर्त्यांमार्फत जनकल्याणाची कामे मार्गी लावणारी पक्षीय शिस्तप्रियता .
१२) आपल्या कट्टर विरोधकांशीही सोहार्दपूर्ण व सभ्यतापूर्वक वर्तणूक 
१४) सुमार नेतृत्व क्षमता असलेल्यांच्या अनाठायी महत्वाकांक्षेला चाप . 
 १६) राष्ट्रीयत्व जोपासणाऱ्या विचारसरणीचा पुरस्कार . 
१८) निवडक अशा घटक समूहाच्या लांगूलचालनाला बगल . 
राजकीय पक्षांबाबतची ही काही गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन कोणता राजकीय पक्ष या कसोटीवर अगदी तंतोतंत नव्हे पण अधिकाधिक प्रमाणात या  सत्यतेवर उतरण्याची शक्यता वाटते  याची पक्की खात्री करून घेत आपणास जो कोणता राजकीय पक्ष या निकषांनुसार तपासणीअंती योग्य वाटतो त्यास  दीडशेपार म्हणजेच  १५० - १५५ च्या जवळपास असणाऱ्या आमदारसंख्येचा आकडा  त्या राजकीय पक्षाला जनतेने प्राप्त करून दिल्यास यातून जनेतेचीच नेहमीची होणारी डोकेदुखी  व मोठे नुकसान पाचवर्षाचा काळ पुर्ण होईपर्यंत थांबेल आणि यापुढे तो राजकीय पक्ष  ' आमच्याकडे एकहाती सत्ता ' नसल्यामुळे आम्ही लोकविकासाची कामे करू शकलो नाही , अशी सबब सांगून त्याचा ठपका जनतेच्या माथी मारण्याची हिंमत दाखवणार नाही . जनतेच्याच निर्णयावर  २०२४ मधिल विधानसभेच्या सत्तासमिकरणाची मदार अवलंबून असणार आहे .पिचलेली , त्रासलेली जनता  राजकारणी मंडळींना आपल्यावर असला आरोप करण्याची संधी मुळीच देणार नाही आणि आपली व राज्याची होणारी फरफट , पिछेहाट  एकदाची  दूर  करण्यात  यशस्वी होईल. बरं यामुळे जनतेबरोबरच ज्यांच्याकडे स्पष्ट बहुमत असलेल्या , एकहाती सत्तेची सूत्रे सोपविली जातील त्या राजकीय पक्षाला सुध्दा लोकांच्या सर्वांगीण विकासाची कामे बिनदिक्कतपणे करता येणं सहजगत्या सोपे होईल . अंतिमतः म्हणूनच " साध्या माणसांची मोठी ताकद " लाखमोलाची असते व त्यामुळेच " आपला निर्णय , आपला विकास " असे ठामपणे म्हणता येते . २०२४ च्या विधानसभेचा रणसंग्राम फार काही दूर नाही . त्याच्या पूर्वतयारीची सुरूवात आतापासूनच करायला काही हरकत नाही . म्हणूनच हा " जनमार्ग " निर्णायक परिणाम घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे . महाराष्ट्रासह इतर राज्यांसाठी सुध्दा तो दिशादर्शक  म्हणून सिध्द होणार आहे .
       
         गंगाधर कांबळे
          मुख्य संयोजक
लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड
 ( मो. नं. - ९५०३८५७९९८ )
 

Post a Comment

0 Comments