कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेला शेतकऱ्यांच्या व्यवहार व महागाईचा
जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून, भाजीपाल्यापासून किराणा वाणापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गतवर्षभरात महागाई प्रचंड वाढली असताना त्या तुलनेत उत्पन्नात वाढ न झाल्याने घरखर्च चालवताना काटकसर करावी लागत आहे.
श्रावण महिन्यात विविध
सणावारांची रेलचेल असते, आगामी काही दिवस सणासुदीचे असल्याने बाजारपेठेत तेजी आली आहे. सर्वच वस्तूंचे दर वधारले आहेत. विशेषतः किराणा वाणांच्या दरात मोठी तेजी पाहावयास मिळत आहे. साखर, शेंगदाणा, साबुदाणा, तूरडाळ आदी वाणांचे दर गतवर्षीच्या तुलनेत १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर वधारले असल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे. आगामी काळात सणासुदीचे दिवस असल्याने आणखी काही दिवस तेजी येण्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे ऐन श्रावणात जनतेला महागाईच्या धारांचा सामना करावा लागत आहे .
■ गृहिणीच्या किचनमधील आवश्यक समजली जाणाऱ्या तूरडाळीवर महागाई झपाट्याने वाढत आहे.
• काही दिवसांपूर्वी १०० रुपये किलो असलेली तूर डाळ आता १२० रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचली आहे. डाळीच्या 'दर्जानुसार दर कमी अधिक आहेत.
साबुदाणा २० रुपयांनी महाग
■ गत महिन्यात ६० रुपये प्रती किलो असलेला साबुदाणा आता ८० रुपये प्रती किलोवर पोहोचला असल्याने साबुदाण्याच्या दरात २०
■ उपवासाच्या दिवसांत शेंगदाण्याची मागणी वाढत असते. त्यामुळे सध्या शेंगदाण्याचे दरही वाढले आहेत.
गतवर्ष ९० ते १०० रुपये प्रती किलो दराने मिळणारा शेंगदाणा आता ११० ते १२० रुपये प्रती किलोवर पोहोचला आहे. शेंगदाण्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
■ साखरेच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळतो. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने साखरेचा गोडवा महागला आहे.
■ सध्या बाजारपेठेत साखरेचे दर ३८ ते ४० रुपये प्रती किलो आहे. येत्या काळात त्यात आणखी वाढीची शक्यता आहे.
सरकारचे लक्ष फक्त सत्ताकरणाकडे आहे. कोण उपाशी आणि कोण तुपाशी या सर्व बाबीचा विचार कोण करणार राब राब राबून शेतकरी कबाळ कष्ट करतो शेतात पेरणी करतो हातात आलेल्या पिकाला भाव मिळत नाही. आणि निसर्गाने दगा दिला तर शेतातलं धान्य घरीही आणता येत नाही. यावर्षी पावसाने तडाका लावल्यामुळे शेतातली तूर मात्र जळून गेली सोयाबीनची वाढ खुटली मग उत्पन्न तरी कसं होणार. आमदार खासदार यांना 70 हजाराची पेन्शन शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये मेला रे शेतकरी बोंबलू बोंबलू मेला विधान भवनात एकाच वाघाने शेतकऱ्यासाठी डरकाळी फोडली ते म्हणजे बच्चू कडू .
मी कुण्याही पक्षाचे किंवा खासदार आमदाराचे तुंतुने वाजवत नाही. राब राब राबून शेतकऱ्याच कर्ज फिटत नाही. साहेब पाच वर्षे आमदार खासदार झाले की कोट्यावधीत होतात मंत्रीपद मिळावा म्हणून नंदीबैला सारखी मान हलवतात मात्र शेतकऱ्याचा कोणीच पोट तिडकेने प्रश्न मांडत नाही. विधान भवनात शेतकऱ्याच्या हिताचे बोलले जाते किंवा त्यांचे प्रश्न मानले जाते अशांना मंत्रिपद मिळत नाही. कोणत्याही पदाची लालसा न करता शेतकरी पुत्र प्रहार चे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांनी जो प्रश्न मांडला त्या प्रश्नाचे सर्वतोपरी कौतुक केले जात आहे. आमदार साहेब महागाईवर बोला.
किचनमध्ये आवश्यक त्या वस्तू लागतातच. आवश्यक वस्तूत काटकसर करताच येत नसल्याने महागाईमुळे बजेटच कोलमडले आहे.
कुटुंब छोटे असल्याने वर्षभरापूर्वी पाच हजार रुपयांत महिन्याचा किराणा येत असे. यंदा महागाईचा मोठा फटका बसत आहे. किराणा खर्च 15 हजारांच्यावर गेला आहे. महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिंदे सरकार तोडगा काढेल का ?
0 Comments