मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशाने वाशिम घटकातील सर्व विभागातील गणेशोत्सव मंडळांच्या व श्रींच्या मूर्तीचे सुरक्षिततेसाठी सर्व गणेशोत्सव मंडपांना QR Code लावण्यात आले आहेत.
संबंधित विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार, बिट मार्शल, निर्भया पथक व Dial 112 पथक हे सातत्याने गस्तीवर असून सदर QR Code Scaning मूळे प्रभावीपणे गस्त पेट्रोलिंग शक्य होईल.
नागरिकांनी 'गणेशोत्सव-2022' भक्तिभावाने, हर्षोउल्हासात व आनंदाने नियमांचे पालन करत शांततेत साजरा करावा व शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यास पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
0 Comments