मानवी जीवन जगत असताना प्रत्येकच माणुस कुठला ना कुठला छंद जोपासत असतो. जीवन जगण्याचा मार्ग दाखवण्याचा खरं काम छंद करतात.गणरायाचे रूप अनेक कलाकारांना भुरळ पाडल्या शिवाय राहत नाही.अनेक कलाकार आपापल्या परीने गणरायाला आपल्या कलेत साकारत असतात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाडचे तालुक्यात गोपाल खाडे व नरेंद्र खाडे हे असेच दोन भन्नाट भावंडही अशीच.या दोघांनी थोडे थोडके नव्हे तर तब्बल पंधरा हजाराच्या वर गणपतीच्या चित्रकात्रणाचा संग्रह केला आहे.
एका सोनेरी गणपती चित्रापासून या संग्रहाला सुरुवात झाली आणि आज अजब गजब दुनिया मोरया आम्हा तुझा छंद ची तयार झाली.गोपाल खाडे हे जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे शिक्षक या पदावर तर नरेंद्र खाडे हे मानोरा पोलीस स्टेशनला जमादार या पदावर कार्यरत आहेत.आपल्या नोकऱ्या इमाने इतबारे सांभाळत ते आपला छंद मनापासून जोपासतात.ही सर्व चित्र त्यांनी वर्तमानपत्रे,मासिके,साप्ताहिक, शुभेच्छापत्रे,लग्नपत्रिकेतून संग्रहित केली आहे.
बारा राशीचे मेषेश्वर, ऋषभेश्वर,मिथुनेश्वर,कर्केश्वर, सिंहेश्वर,कन्येश्वर,तुळेश्वर, वृश्चिकेश्वर,धनेश्वर,मकरेश्वर कुंभेश्वर व मिनेश्वर हे बारा गणपती आपलं आगळं वेगळं वैशिष्ट्य ठेवून आहेत. प्रत्येक राशीला आपला एक अर्थ असतो त्या अर्थानुसार हे बारा गणपती चित्र आहेत.मिन म्हणजे मासा, कन्या म्हणजे मुलगी,कर्क म्हणजे खेकडा,धनु म्हणजे धनुष्यबाण अशा बारा आकारात हे बारा गणपती चित्रकात्रण उपलब्ध आहेत.तसेच गोपाल खाडे शिक्षक असल्याने त्यांनी मराठी,इंग्रजी,हिंदी,इतिहास, भूगोल,विज्ञान,गणित या विषयांच्या नावात सुद्धा गणपती चित्र काढलेले आहेत.तसेच एक ते दहा अंकामध्ये गणरायाची रूपे रेखाटली आहे.अष्टविनायकाची विविध चित्रे व रूपे पाहायची तर या संग्रहातच.गणपतीची व्यंगचित्रे ही या बंधूच्या संग्रहात ठाण मांडून आहेत.यापूर्वी महाराष्ट्रात सोलापूर,अमरावती,अकोला, खामगावं सारख्या अनेक शहरांसह महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सुद्धा या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.रसिक श्रोत्यांनी भरभरून या प्रदर्शनी ला प्रतिसाद दिला.
खाडे बंधूंनी सातत्याने जिद्द, संयम व चिकाटीच्या जोरावर हा संग्रह जोपासला आहे. त्यांच्या जिद्दीला व चिकाटीला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
0 Comments