मंगरुळपीर भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य व चितलांगे इंण्डेण गॅसचे संचालक, मनमिळाऊ स्वभावाचे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम लालचंद चितलांगे यांचा वाढदिवस दिनांक 01 सप्टेंबर रोजी स्थाणिक चारभुजा मंदिरामध्ये विविध उपक्रमांनी शेकडो चाहत्यांच्या व मित्र परिवार भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार,व विविध क्षेत्रातील मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात वाढदिवस संपन्न झाला. बॅनर पोस्टर अनाठायी खर्च न करता वेगळ्या पद्धतीने दरवर्षी अनेक रोग निदान शिबिर घेऊन विविध क्षेत्रातील डॉक्टरांना आमंत्रित करण्यात येते.
याप्रसंगी डॉ.प्रनय महल्ले विठाई हॉस्पीटल अकोला, नेत्ररोज तज्ञ डॉ.मनिष पावसे वाशिम,डॉ.स्विटी गोटे (दहातोंडे), मनिष भुतडा अकोला, डॉ.जयंत पिंपरकर, डॉ.डाळे रक्त पथपेठी व स्टेट बँकेचे कर्मचारी यासर्वांनी याशिबीरात उत्कृष्ट कामगिरी करत रुग्णांना व विविध भागातील नागरिकांना विमा सेवा दिली. या शिबीरामध्ये 520 रुग्नांनी निशुल्क लाभ घेतला तर 250 महिलांनी प्रधानमत्री सुरक्षा योजनेचा लाभ घेतला. तसेच 31 जनांनी रक्तदान केले. यासोबतच वृक्षारोपन , फळवाटप, अन्नदान असे विविध कार्यक्रम चितलांगे इण्डेण गॅस, भाजपा परिवार, मित्र परिवार, यांनी केले.
चितलांगे इण्डेण गॅस तर्फे दरवर्षी विविध सामाजिक व लोकोउपयोगी कार्यक्रामाचे आयोजन निस्वार्थपणे गेली अनेक वर्षापासून सुरु असते.
0 Comments