राष्ट्रीय सेवा योजना मुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व त्यासाठी तसी संधी रासेयो उपलब्ध करून दिली जात असल्याचे मत तुळशीराम जाधव महाविद्यालयातील डॉ. डी एम ढवारे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त दि. 24 सप्टेंबर 2022 आयोजित कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले. 24 सप्टेंबर 1969 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना करण्यात आली. हा दिवस सर्व भारतभर राष्ट्रीय सेवा योजना दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देश प्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव, त्याशिवाय ग्रामस्वच्छता, पर्यावरण सुरक्षितता, मतदार जनजागृती असे समाज प्रबोधनात्मक विविध उपक्रम राबवता येत असल्याचे त्यांनी मत मांडले. रासेयो पथकाच्या वतीने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी मिळाल्याबद्दल डॉ ढवारे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. विलास गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना हे सामाजिक परिवर्तनाचे मोठे व्यासपीठ असल्याचे सांगितले. तर डॉ जी एस कुबडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील श्रम संस्कारामुळे युवक हा खऱ्या अर्थाने समाजशील बनत असल्याचे सांगितले. याशिवाय समाजासाठी जे काही चांगले करता येईल ते सर्व करण्याची प्रेरणा रासेयो मार्फत उपलब्ध करून दिली जात असल्याचे मत मांडले. डॉ.पी.जे. गोटे यांनी विद्यार्थ्यांच्या मनात ही निस्वार्थ सेवाव्रती जागृत करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी अशोक गुडदे, कु. श्रद्धा अडाणे, अभिषेक वैद्य, अरविंद इंगोले, विजया खंदारे, वैष्णवी ठाकरे, राधा ठाकरे, प्रियंका बरखम, साक्षी बियाणी, प्रतिक्षा शिकारे, मानवी वानखेडे, राधा ठाकरे, अंजली वानखेडे, वैष्णवी ठाकरे, मुस्कान भवानीवाले, प्रज्वल जीचोटे, शैलेश टेकाळे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. बी. चांदजकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कु. सागर वानखेडे हिने तर उपस्थितांचे आभार कु. आरती भालेराव हिने मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने करण्यात आली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments