Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. एच. कान्हेरकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्षेत्रिय समन्वयक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती तथा वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव कुमार इंगळे व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.एस. भगत हे उपस्थित होते.
 कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी राष्ट्रीय सेवा योजने बाबत सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएससी भाग एक च्या स्वयंसेविका कुमारी स्नेहल इंगळे यांनी केले व प्रास्ताविक कुमारी महिमा जयस्वाल यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कुमारी खिराडे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना दिन हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.चंद्रकांत उल्हे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. महिला कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सुषमा जाजू यांची उपस्थिती होती. खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments