Ticker

6/recent/ticker-posts

कासोळा प्रा. आ. कें. चे डाॅ. खान यांच्या चुकीच्या उपचाराने मुलाचा मृत्यू.

    डॉक्टरच्या  हलगर्जीपणामुळे        नीष्पाप विठ्ठल चा मृत्यू 

मंगरूळपीर:-
     डाॅक्टरांना  सर्वसामान्य माणूस देव मानतो . कारण हाच माणूस याच डाॅक्टरवर खूप मोठा विश्वास ठेवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत असतो . डाॅक्टरवरील हाच अतिविश्वास जेव्हा जीवघेणा ठरतो तेव्हा मात्र मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय दुसरा कुठलाच इलाज शिल्लक राहत नाही . अशाच भयानक व संतापजधक प्रकार मंगरूळपीर तालुक्यातील सायेखेडा येथील संजय आनंदा काळे यांच्या १६ वर्षीय विठ्ठल संजय काळे नामक मुलाच्या बाबतीत घडला असल्या संपूर्ण तालुकाभर याविषयी हळहळ व्यक्त केल्या जात आहे . 
       याबाबत घडले असे की , संजय काळे यांनी कासोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या विठ्ठल नावाच्या मुलाला येथील डॉ. खाना यांचेकडे नेले तेव्हा डॉ . खान यांनी संजयच्या अंगावरील पांढरे डाग बघून त्यावर कृष्ठ रोगाचे उपचार सुरू केले . सोबतच दोन महिन्यांच्या गोळ्या देऊन त्या सतत घेतल्याचा सल्ला दिला . दोन महिन्यापर्यंत गोळ्या घेऊन सुध्दा विठ्ठलची बिमारी थांबण्याऐवजी त्याला पोटाचा त्रास सुरू झाला . तेव्हा  रूग्णाचे वडील संजय यांनी पुन्हा डाॅ. खाना यांना आपल्या मुलासह भेटून मुलालाही जासतच त्रास होत असल्याचे डाॅक्टरांच्या निदर्शनास आणून दिले असता त्यांनी मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्याचे सांगितले . तेथून  अकोला जाण्याचे सांगीतले . तेव्हा संजय काळे यांनी आपल्या मुलाला एका खाजगी दवाखान्यात नेले . येथील खाजगी डाॅक्टरांनी बिमारी आवाक्याबाहेर गेली आहे , तुम्ही मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला . शेवटी संजय काळे आपल्या मुलाला मुंबईला घेऊन गेले असता अवघ्या दोन दिवसांत विठ्ठलचा मृत्यू झाला . डाॅक्टरच्या चुकीच्या उपचारांमुळे विठ्ठलचा जीव गेला अशी तक्रार मृतकाच्या  वडीलांनी वरीष्ठांकडे केली असून आपल्याला न्याय मिळावा असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे . डाॅक्टरांच्या असल्या हलगर्जीपणामुळे एका नीष्पाप मुलाचा मृत्यू झाला असून यातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संबंधीतांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृतक विठ्ठलचे वडील संजय आनंदा काळे यांनी आरोग्य मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाव्दारे केली आहे .

Post a Comment

0 Comments