वाशिम
मंगरूळपीर तालुक्यातील
अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनातर्फे आर्थिक मदत देणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिंदे सरकार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री ना अब्दुल सत्तार यांनी केले.
या २३ रोजी स्थानिक जुन्या पंचायत समितीच्या सभागृहात हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियानाअंतर्गत आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
कोणत्याही नेत्याला कधीही भेटायला न गेलेले आणि कार्यकर्त्याच्या घरापर्यंत भेटायला गेलेले वंदनीय बाळासाहेब यांची छबी कोणामध्ये दिसत आहे?
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा भावनाताई गवळी होत्या तर शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे,नवी मुंबई चे माजी नगरसेवक संजू भाऊ आधार वाडे,तालूका प्रमुख मनीष गहुले,अनिल गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खा भावनाताई गवळी यांनी सांगितले की,अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने पीक विमा कंपन्यांना आवरावे शेतकऱ्याचा मोबदला न दिल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही असे त्या म्हणाल्या.यावेळी जिल्हाप्रमुख ठाकरे,संजय वाडे यांनीही शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणी बद्दल मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन गौरव कुमार इंगळे यांनी केले तर शेख नवेद . शंकर भैय्या ठाकूर व इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.
0 Comments