Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छता उपक्रमात ' राष्ट्रध्वजाचा अवमान ' केल्यामुळे उघड झाला अस्वच्छ हेतू !

   झेंडा अवमान प्रकरणी चूक      करणाऱ्यावर कठोर कारवाईची                       मागणी
----------------------------------------

चला, सारे मिळूनी नवी मुंबईचा नावलौकिक वाढवूया 
नवी मुंबईवासियांना आवाहन करण्यात येते की,  '*इंडियन स्वच्छता लीग'* या उपक्रमात नवी मुंबई शहराला कचरामुक्त शहराचा बहुमान मिळवून देण्यासाठी व नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी गुरुवार, दि. 22  सप्टेंबर रोजी, सकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत सानपाडा मोराज रेसिडेन्सी ते नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय दरम्यान पाम बीच मार्गावर  मानवी साखळी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. खरोखर हा उपक्रम खूप छान होता. या उपक्रमात नवी मुंबईतील सामाजिक संस्था  (NGO), महिला मंडळे, महिला बचत गट, युवक मंडळे,  शाळकरी मुले, विविध सामाजिक संघटना, सन्मा. लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते हजर होते. जेव्हा जेव्हा महानगरपालिका आवाहन करते, तेव्हा प्रत्येक वेळी हे सर्व सहभागी होत असतात, तसेच आजही सर्व सकाळी 7.30 पासून भर  पावसात सहभागी झाले होते.  यावेळी भारताचा तिरंगा  साखळी दरम्यान प्रत्येक माणसाच्या हातात दिला होता. परंतु या भारताच्या तिरंग्यामध्ये अशोक चक्रांचा समावेश कुठेही नव्हता. त्यामुळे भारताच्या तिरंग्याचा खूप मोठा अपमान झाला आहे. शाळकरी मुले यालाच आपला राष्ट्र ध्वज समजले, तेव्हा बहुतेक महिलांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला व निघून गेल्या. संबंधित अधिकार्यांना विचारले असता चुकीचे उत्तर देण्यात आले. महिला संस्थांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे बरेच लोक नाराज झाले. स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवताना स्वच्छता बॅनर म्हणून तिरंगाच का? त्या  ऐवजी स्वच्छता अभियानाचा सिंगल कलर कोणताही बॅनर असता तर खूप बरे झाले असते.  ज्यांच्यामुळे ही चूक झालेली आहे, त्यांनी ती का केली? यामागचा उद्देश काय? भारताचे नागरिक म्हणून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान सहन न झाल्या कारणाने हे पत्रक सादर करीत आहे .
आणि ज्यांच्यामुळे ही चूक झालेली आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रध्वजाप्रती अस्सीम निष्ठा असणाऱ्या अनेक महिला व पुरुष मंडळींनी या निवेदनाद्वारे केली आहे.  ही बाब अतिशय अक्षम्य असल्याने  यात दोषी असणाऱ्यांवर संबंधीतांवर कोणती  कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे .
राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र केले गायप
        
       राष्ट्रध्वजाप्रति आस्था असणाऱ्यांकडून जाहीर निषेध                   जाहीर निषेध !

Post a Comment

0 Comments