मंगेश भाऊ धानोरकर त्यांच्या प्रभावी कार्याचा थोडक्यात लेखाजोगा मांडण्याचा प्रयत्न.
शिक्षण, शेती, ग्रामीण भागाची नाळ जुळलेला,गोरगरिबाची जाण असलेला
कॅप्टन सुदामराव धानोरकर.
महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रात फार मोठे मोलाचे कार्य केलेल्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील सामाजिक चळवळीत कर्तुत्वान निस्वार्थी भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य मंगेश भाऊ धानोरकर श्री धानोरकर आदर्श विद्यालय धानोरा खुर्द मंगरूळपीर तालुका जिल्हा वाशिम
यांना नजरेआड करून चालणार नाही. म्हणून अशा व्यक्तीची समाजाने नोंद घेणे काळाची गरज आहे.समाजसेवा, सामाजिक कार्याच्या चळवळीतील अहोरात्र कार्यरत असलेल्या आपल्या कार्याने जिल्ह्यातील ग्रामीण सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र असा ठसा उमटवणारा धडाडीचा कार्य करणारा समाजसेवक मंगेश भाऊ धानोरकर यांचे बालपण मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा खुर्द या खेड्यात गेले .
त्यांच्या जीवनाची सुरुवात लहानपणापासूनच कष्ट आणि संघर्ष करण्याची जिद्द असलेला माणूस म्हणजे मंगेश भाऊ धानोरकर त्यांनी राजकारणातील अनेक पदावर कार्य करत असतानी त्यांनी सामाजिक बांधिलकी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता तसेच समाजसेवेसाठी आजोबा कॅप्टन धानोरकर आणि वडिल नानासाहेब धानोरकर त्याचबरोबर त्यांच्या मातोश्रीं रजनीताई धानोरकर यांनी लावलेल्या शिक्षण रुपी वटवृक्षाच्या व ज्ञानरूपी सागराचे अमृत खेड्यापाड्यात शिक्षणाच्या माध्यमातून घराघरात जाऊन विद्यार्थी घडवण्याचं कार्य आज मंगेश भाऊ धानोरकर त्यांच्या पत्नी अंजलीताई धानोरकर करत आहे.
दुधात साखर पडल्यागत स्थिती झाली.कारण त्यामुळे त्यांच्या कार्याची गती एकदमच वेगाने वाढली व ते एक निष्ठेने मनोभावे सामाजिक कार्याला वाहून घेऊ लागले तसेच ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थी घडवत असताना युवकांना जागृत करणे तसेच आर्थिक,सामाजिक,क्रीडा विषयक उपक्रम राबविणे व युवकांना विध्वंसक कार्याकडून विधायक कार्याकडे वळविली त्यांच्या मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करून संपूर्ण जिल्हाभर आपले सामाजिक कार्यक्षेत्र यांच्या मार्फत सामाजिक कार्य अविरत चालू आहे. स्वकर्तृत्वावर फळाची आशा न करता कार्य करीत राहिल्यास फळे आपोआप मिळतील त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगेश भाऊ धानोरकर होय. राजकीय क्षेत्रात कार्य करत असताना तेव्हा त्यामुळे त्यांची कार्य तत्परता खूपच वाढली आपली कोणीतरी कदर करणारे आहेत याची जाण होऊन सामाजिक कार्यात जास्त रुची निर्माण झाली व त्यातूनच जनसामान्यांवर त्यांचा प्रभाव पडून एक नवा समाज जागृती तयार करणारा आशेचा किरण निर्माण होऊन तळागळातील लोकांना आधार दिला. अगदी कमी वयात राजकीय क्षेत्रात आपली वचक निर्माण केली
खेडोपाडी जाऊन त्यानी लोकांना आपुलकीने प्रेमाने जमेल ती मदत केली .
राजकीय पक्षाच्या ध्येय धोरणात सहकार्य करणारे युवक म्हणून प्राचार्य मंगेश भाऊ धानोरकर सुपरिचित आहेत ह्यातच त्यांच्या कार्याचे कर्तृत्व दिसून येते. व सामाजिक चळवळीतील, मूर्ती लहान पण कीर्ती महान, असलेले नवे कार्य करणारे समाज सेवक मंगेश भाऊ धानोरकर यांच्या कार्याचा गौरव करणे अगत्याचे वाटते. यावरून आजच्या युवकांनी बोध घेऊन सामाजिक कार्य करण्याकरता पुढे यावे हा उद्देश आहे. मंगेश भाऊ धानोरकर यांचे समाजकार्य वाढतच गेले. रोग निदान शिबिर, आरोग्य शिबिर, रक्तगट शिबिर, रक्तदान शिबिरे, क्रीडा स्पर्धा, साहित्य संमेलने, कवी संमेलन, युवक मिळावे, सामाजिक कार्यकर्ता मेळावा, शेतकरी मेळावा, महिला मेळावा,घेऊन न थांबता सतत आतापर्यंत रक्तदान करून अनेकांचे जीव वाचवले.एवढेच नव्हे तर अजूनही त्यांनी आपला मार्ग निवडून वर्षातून एक वेळ अर्जंट काम पडेल त्यावेळेस रक्त देण्याचा संकल्प पुढे चालू ठेवला आहे. अशाप्रकारे ते रक्तदान करतात पण अडचणीत सापडलेला रुग्णांना रक्त उपलब्ध करून देत असतात.एवढेच नव्हे तर भ्रष्टाचार, हुंडाविरोधी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य चे कार्य तितक्याच मेहनतीने व कष्टाने करीत असतात
अनेक विषयांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून तसेच संघर्ष करून जीवन जगणाऱ्या समाजासाठी झटणारे कार्यकर्त्यांचा गौरव केला जात असतो. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे प्राचार्य मंगेश भाऊ धानोरकर वाशिम जिल्हा पुरते मर्यादित न राहता संपूर्ण विदर्भ महाराष्ट्र त्यांना एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून तसेच म्हणून संपूर्ण महाराष्ट्र स्तरावर त्यांचे नाव घेतले जात आहे. अशा नीस्वार्थी निपक्ष निधर्मी, समाजसेवक म्हणून प्राचार्य मंगेश भाऊ धानोरकर यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. वाशिम जिल्ह्याच्या युवा कार्यकर्त्यांच्या फळी मध्ये मंगेश भाऊ धानोरकर
वाशिम जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात तन-मन-धनाने स्वताला झोकून पूर्णवेळ या क्षेत्रात कार्यमग्न हाडाचा कार्यकर्ता म्हणून मंगेश भाऊ धानोरकर यांच्याकडे पाहिल्या जाते सामाजिक क्षेत्रात झटून कार्य करत असलेल्या या युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा गुणाचा गौरव निश्चितच व्हायला हवा समाजसेवेसाठी कार्यरत असणारे श्री मंगेश भाऊ नानासाहेब धानोरकर यांनी जिल्ह्यात तसेच ग्रामीण परिसरात सतत कार्यरत राहून जास्तीत जास्त युवकांना नागरिकांना सामाजिक कार्यात खेचून घेतले आहेत. आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
युवकांना आपल्या वक्तृत्व आणि व्यक्तिमत्त्वाने आपलेसे करून संघटित करण्याची हातोटी मंगेश भाऊ यांना अगदी छान जमली आहे त्यांच्या संपर्कात येणारा एखादा युवक चटकन जोडून त्यांनी आपलासा केला नाही असे होणे शक्य नाही तसेच त्यांच्या संपर्कात येणारी व्यक्ती त्यांच्या कार्याने प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही केवळ हुल्लडपणा म्हणून गर्दीत सामील होणाऱ्या युवकांना त्यांनी विधायक कार्यास लावले. मंगेश भाऊ या युवा कार्यकर्त्याचा सामाजिक कार्याचा गौरव करावा तेवढा कमीच आहे .
माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले काही वाईट, काही कधीच लक्षात न राहणारे, काही कायमचे मनात घर करणारे, मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली त्यातले एक तुम्ही,म्हणून भाऊ व्यक्तिमत्व आपका शान है हमारी, कर्तुत्व आपका पहचान है हमारी, हिफाजत करना है,जिंदग की क्युकी सासे आपकी जान है शुभेच्छुक वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
0 Comments