Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुलपीर नगर परिषद समोर घरकुल लाभार्थी चे ठिय्या आंदोलन.

मंगरूळपीर येथील घरकुल लाभार्थीनी नगरपरिषद मंगरूळपीर यांचे कडे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अप्राप्त निधीची अनेक वेळा मागणी केली आहे. परंतु सर्व लाभार्थ्यांना वेळोवेळी केवळ तोंडी आश्वासन मिळाले. शासनाच्या या उदासीन वृत्तीचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गौरव कुमार इंगळे यांचे नेतृत्वात आज नगरपालिका मंगरूळपीर चे कार्यालय समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अपूर्ण घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी कर्ज काढून बांधकाम केले आहे व काहींना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. काही दिवसावर दिवाळी सण असताना सुद्धा अजूनही लाभार्थ्यांना त्यांचा अंतिम हप्ता मिळाला नाही.
ही बाब गौरव कुमार इंगळे यांचे लक्षात आल्यावर त्यांनी नगरपालिका प्रशासन यांना सर्व घरकुल लाभार्थ्यांसह ठिय्या आंदोलनावर बसण्यासंदर्भात कल्पना दिली. पालिका प्रशासनाने निधीची मागणी शासनाकडे केली असल्याचे कळले परंतु शासनाने अद्याप निधी पालिकेकडे न वळवल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना निधीचे वाटप होऊ शकत नाही असे उत्तर मिळाले.
गोरगरीब घरकुल लाभार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचण्यासाठी थाळी वाजवून आम्ही ठिय्या आंदोलन करीत आहोत. शासनाने याची दखल घ्यावी व सर्व घरकुल लाभार्थ्यांचा अप्राप्त निधी त्यांना द्यावा.
गौरव कुमार इंगळे सामाजिक कार्यकर्ते.मनोज इंगळे,विजय हिमगिरे, संजय कोराने, अनंता ताटर, नितीन विटकरे, अब्दुल करीम , कलंदर शाह, उमर खान ,अब्दुल जब्बार अब्दुल रझाक,अब्दुल कुद्दुस, बजरंग पेंढारकर, शर्मा,नदीम खान,खुर्शीद जमाई, आईशा बी हशरत खान, नुर खान,प्रल्हाद मात्रे,
इरफान शेख सामजिक कार्यकर्ते 

Post a Comment

0 Comments