समाजिक हित जोपासणारी यंग सिटीझन फोरम ही संस्था दरवर्षीप्रमाणे सतत सात वर्षापासून एक क्षण सुखाचा हा उपक्रम राबवत आहे. यंग सिटीझन फोरम एक क्षण सुखाचा हा उपक्रम वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत आणि पालातील लहान मुलांसोबत साजरा करतात. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे वृद्धाश्रमातील वृद्ध हे आपल्या मुलाबाळांन पासून नातेवाईकां पासून दूर झालेले असतात. त्यांच्यातील त्या दुःखद भावनेला विरक्त करण्यासाठीं
त्याचबरोबर पालातील लहान मुलांना आणि शहरातील गरजूंना फराळाचे वाटून त्यांचा सोबत दिवाळी आनंदाने साजरी करण्यासाठी यंग सिटीझन फोरम हा एक क्षण सुखाचा उपक्रम राबवत आहे. एक क्षण सुखाचा या उपक्रमामध्ये वृद्धांच मनोरंजन व्हाव आणि त्यांनापण प्रबोधनात्मक विचार मिळावे. पालातील लहान मुलांना दिवाळीच्या छान फराळाचे मिळावं, सर्वांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या हेतूने जाहीर कीर्तनाच आणि फराळ वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस
चित्रऋषी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी ह.भ.प. ॲड. ऋषिकेश महाराज पाटील यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कीर्तनामध्ये महाराजांनी माणसामध्ये मी देह नसुन देव आहे "अहं ब्रम्हास्मी " ही अत्युच्च भावना निर्माण झाली की त्याच्या संपूर्ण भौतिक दुःखांचा नाश होतो. अर्थातच माणसाने कुणाकडून ठेवलेली अपेक्षा हीच त्याच्या दुःखाल
सुंदर करावे कथा, कीर्तन | दिंड्या खेळ, मनोरंजन |
परी लागावी उत्तम चालचलन | समजसी | वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या विचारांना घेऊन कार्य करत आहे.
ज्या शहरांमध्ये युवक अशे सामाजिक बोधत्मक उपक्रम आयोजित करतात त्या शहराचा आणि समाजाचा विकास हा निश्चितच आहे. असे मत त्यांनी मांडले. कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृद्धांना फराळाचे वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर सागर मानेकर यांचा त्यांनी वृद्धांसाठी दिलेल्या सेवेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. वृद्धाश्रमातील फराळ वाटप करून पालातील आणि गावातील गरजूंना फराळाचे वाटप करण्यात आले.
मान्यवरांमध्ये ॲड. प्रकाश इंगोले,रमेश नावंधर,रमेश शिंदे, गोपाल गावंडे, राम नंदनकर,राम व्यवहारे, अशोक परळीकर,अविनाश देशमुख,भगवान इंगोले,दत्ता व्यवहारे,अजाबराव देशमुख, कैलास येवले,सुधाकर चौधरी, फुलचंद भगत,अशोक राऊत, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूचित देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णव इंगोले यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी यंग सिटीझन फोरमचे निलेश तुळजापूर,सागर गुल्हाने, आकाश चौधरी, श्रीजीत देशमुख, समरजीत रघुवंशी, मयुर पाटील, करण मुंधरे, वैष्णव इंगोले, सुचित देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments