घरातील महीला हिच खरी लक्ष्मी असल्याचे मत
अनेक दाम्पत्य या ऊपक्रमातुन घेतायेत प्रेरणा
जिवनसंगिनी हीच घरातील खरी ग्रुहलक्ष्मी तिचा शक्य तितका सन्मान करा व तिच्याशी प्रामानिकतेने एकनिष्ठ राहा व आईबाबांची सेवा करा जिवन समाधानी व सुखकर होईल
वाशिम - ....
दिवाळीच्या दिवशी सर्वत्र मूर्तीच्या लक्ष्मीचे पूजन केले जाते. असे असतांना महापूरूषांचा वारसा घेऊन सत्याच्या मार्गाने वाटचाल करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घराला घरपण देणाऱ्या आपल्या पत्नीनाच लक्ष्मी मानून त्यांचे लक्ष्मीपूजन दिनी पत्नीपूजन करून आरती ओवाळून , दर्शन घेत त्यांना साडीचोळी भेट देत अनोख्या पध्दतीने
( दि. २५ ऑक्टोबर ) रोजी जिल्हाभरात दिवाळी साजरी केली. या आगळ्यावेगळ्या पत्नीपूजन कार्यक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेला सत्यशोधक कार्यकर्त्यांचा हा पायंडा आता सर्वत्र रूढ होत आहे.
आनंद, उत्साह व जल्लोषाचे प्रतिक म्हणून पारंपारीक पध्दतीनूसार दिवाळी हा सण साजरा केला जातो. परंतू बलीप्रतिपदेच्या दिेवशी दानशूर अशा प्रजावत्सल बळीराजाचा बटू वामनाने कपट नितीने खुन केला.
म्हणून समस्त कृषीप्रधान शेतकरी तथा बहूजनांच्या पराभवाचा हा दिवस असल्याने परिवर्तनवादी विचारसरणीचे लोक दिवाळी दरम्यान बळीराजा स्मृती महोत्सव साजरा करतात. सोबतच घराला घरपण देणारी महीला हिच खरी लक्ष्मी असल्याचे मानून मूर्तीच्या लक्ष्मीचे पूजन करण्याऐवजी आपल्या पत्नीचे पूजन करण्याची प्रथा जिल्ह्यातील सत्यशोधक कार्यकर्त्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व ईतर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रूढ होत आहे.
वाशिम तालूक्यातील भट उमरा येथील सत्यशोधक समाजाचे जिल्हा प्रचार प्रमुख पेन्टर केशवराज काळे हे गेल्या १६ वर्षांपासुन दिवाळीच्या दिवशी आपल्या पत्नीचे साडीचोळी देऊन विधिवत पूजन करतात. त्यांचा वारसा आता जिल्ह्यातील अनेक घरांमधून पूढे जात आहे. यावर्षीही दिपावलीदिनी दरवर्षीप्रमाणे केशवराज काळे यांनी आपल्या पत्नी सौ. मैनाबाई काळे यांचे पूजन करून ओवाळणी करून दर्शन घेत साडीचोळी भेट दिली. यासोबतच सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांनी आपल्या पत्नी सौ. मालती धामणे यांची ओवाळणी करून दर्शन घेत साडीचोळी भेट देऊन पूजन केले. यावेळी ऊभयतांनी शेतकऱ्यांचा दानशूर राजा बळीराजा, राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. रिसोड तालूक्यातील येवती येथील सत्यशोधक समाजाचे जिल्हा कोषाध्यक्ष गणेश नाना शिंदे यांनीही आपल्या पत्नी सौ. अंजली शिंदे तसेच आई व मुलीचे पूजन करून त्यांना साडीचोळी भेट दिली. केकतउमरा येथील सत्यशोधक समाजाचे तालूकाध्यक्ष चंद्रकांत उचितकर यांनी आपल्या पत्नी सौ. निता उचितकर यांचे साडीचोळी भेट देऊन पूजन केले. रिसोड शहरातील व्यावसायीक तथा संभाजी ब्रिगेड पक्षाचे तालुकाध्यक्ष गोपाल खडसे यांनीही आपल्या पत्नी सौ. रूपाली खडसे यांचे विधीवत पूजन करून साडीचोळी भेट दिली. रिसोड तालुक्यातील मोप येथील संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते तथा शाळा बचाव समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पत्रकार गजानन खंदारे यांनी आपल्या पत्नी सौ. लताताई खंदारे यांचे पूजन केले. रिसोड शहरातील संभाजी ब्रिगेड सामाजिक चे तालुकाध्यक्ष तथा फोटो व्यावसायिक रमेश सदार यांनी आपल्या पत्नी सौ. कुंता सदार यांचे पूजन केले. वाशिम येथील अजय सोनूनकर यांनी आपल्या पत्नी सौ. शुभांगी सोनूनकर यांचे पूजन करून साडीचोळी भेट दिली.
तसेच रिसोड तालुक्यातील लोणी येथील रहिवासी तथा प्रसिद्ध शिवधर्म विवाह विधिकर्ते शाहीर पंडीतराव देशमुख यांनी आपल्या पत्नी सौ. जयश्री देशमुख यांचे साडीचोळी देऊन पूजन केले. तसेच वाशिम शहरातील ड्रिमलैंड सिटी मधील रहिवासी सिंधुबाई सोनूने यांनी आपल्या सुना सौ. रेखा सचीन सोनुने आणि सौ. पल्लवी प्रमोद सोनुने यांना विधिवत देव्हाऱ्यात बसवून पूजन केले आणि त्यांनी आणि त्यांच्या मूलांनी दर्शन घेतले. यांच्यासह मंगरुळपीर येथील गायक तथा पञकार यानी सुद्धा आपल्या पत्नीचे पुजन करुन आपल्या घरातील ग्रुहलक्ष्मी खुश तर महालक्ष्मी सदैव प्रसन्न असेल मनुन पत्नीचा सन्मान व आईबाची सेवा हेच खरे लक्ष्मीपुजन आहे असा संदेश दिलाय ईतरही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी बळीराजांना स्मरण करून पत्नीपूजनाचा उपक्रम राबविला.
अपवाद वगळता एकीकडे घरातील कूठल्याच निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी केले जात नाही. महिलांना त्यांच्या स्वत:च्या लग्नामध्ये केवळ पूजा व सन्मान केला जातो. नंतर मात्र, कधीही त्यांचे पूजन केले जात नसल्याची वस्तुस्थीती आहे. ज्या स्त्रीला घरात लक्ष्मी म्हणून बूजूर्ग व्यक्ती उल्लेख करतात. मात्र, प्रत्यक्षात तिला लक्ष्मी म्हणून सन्मान दिला जात नसल्याचे वास्तव आहे. दुय्यम दर्जाची म्हणून तिला कायम उपेक्षित ठेवले जाते. अशा या वातावरणात बहूजन संत तथा महापूरूषांनी दिलेला स्त्री-पूरूष समानतेचा वारसा जपण्याचे काम सत्यशोधक विचारांचे कार्यकर्ते करतांना दिसुन येत आहेत. जिल्हाभरात झालेल्या या पत्नीपूजन कार्यक्रमाचे सर्वत्र कौतूक केले जात आहे. तसेच पत्नीपूजन कार्यक्रमाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हा उपक्रम राबविणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. चूकीच्या रूढी परंपरांना छेद देऊन सत्याचा मार्ग दाखविणार्या या उपक्रमाची चर्चा आता राज्यभर होत आहे.
फोटो कॅपशन- पत्नीपूजन करतांना गजानन धामणे, गणेश शिंदे, अजय सोनूनकर, गोपाल खडसे, चंद्रकांत उचितकर, पंडितराव देशमुख, केशवराज काळे, गजानन खंदारे , रमेश सदार, सिंधुबाई सोनुने,अशोक राऊत मंगरुळपीर
0 Comments