मंगरूळपीर येथील नगरपरिषदेमध्ये अनुभवी मुख्याधिकाऱ्याची नेमणूक करावी
शेख नवेद यांची मागणी नगर परिषदेमध्ये अधिकाऱ्याकडे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सोपविलेली आहे महत्वाचे म्हणजे . सदर नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी हे पुर्णवेळ नसल्यामुळे शहरात विविध समस्या निर्माण होत आहे ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी कुशल व अनुभवी मुख्याधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी संजू आधार वाडे विचार मंचचे उपाध्यक्ष शेख नवेद यांनी दि 21 रोजी उपविभागीय अधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
सदर निवेदनाचा आशय असा की गावातील जनतेच्या समस्येप्रती दखल घेण्याकरीता उपाययोजना होताना दिसत नाही . परिणामी आरोग्याचे प्रश्न , घाणेचे साम्राज्य् . .रोड व नाल्याची दुरवस्था झालेली आहे . कित्येकदा नगर परिषदेमध्ये वरील बाबी निदर्शनास आणुन देऊन सध्या याची गंभीररित्या दखल घेतल्या जात नाही . परिणाम याचा नाहक त्रास जनतेला भोगावे लागत आहे .शासकीय योजना व त्याअंतर्गत येणारा निधी व निर्धारीत विकासात्मक कामे नियमीत व कुशल आणि अनुभवी धारक मुख्याधिकारी नियुक्त् करावा व तसेच कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे जनतेला ह्याचा न्याय मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाविषयी उदासिनता जनतेत पसरलेली आहे . करीता आपणास मंगरूळपीर वासीय सामाजिक कार्यकर्ता या नात्याने नम्र प्रार्थना करतो की , तात्काळ व प्रभावाने लक्ष पुरवून आपण लवकरात लवकर मंगरूळपीर नगरपरिषदेला अनुभवी कुशल व नेतृत्वपुर्ण अधिकारी नियुक्त् करुन जनतेला व विकासात्मक कार्याला चालना देवून सहकार्य करावे . अशी मागणी निवेदनात नमूद असून या निवेदनावर यूनुस खान, नाना देवळे, दीपक सोळंके, मो, नावेद, वसंत मोरे, फैजान खान, सुमित खाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
0 Comments