Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्हयामध्ये अवैध चकी खेळणा-या इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाईत एकुण ५७८४० /- रु माल जप्त.

मा. पोलीस अधिक्षक सो श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे करणाऱ्या इसमावर विविध उपाय योजना अवलंबुन जास्तीत जास्त कारवाई करुन गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत आदेशित केले. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे आदेशाने पो.स्टे मालेगाव पोलीस स्टेशन वाशीम शहर हददीत अवैध चकी खेळणा-यावर इसमावर रेड करणे बाबत आदेशीत केले.
दिनांक १८/१०/२०२२ ते १९/१०/२०२२ रोजी अवैध चकी खेळणा-या इसमावर कार्यवाही करणे

करीता वेगवेगळे पथक तयार करुन रवाना करण्यात आले होते. सदर पथकांना गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या

माहीतीचे आधारे वेगवेगळे पो.स्टे. हददीत अवैध चको खेळत असणारे इसम यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदान्वये

कार्यवाही करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही ही दि.१८/१०/२०२२ रोजी पो.स्टे. मालेगाव हददीत अवैध चकी खेळणारे इसम नामे, संदीप रमेश महाकाळ रा. मालेगाव हे ऑनलाईन चकी खेळत असतांना वापरण्यात येणारे मोबाईल फोन कि. १०,००० रु. नगदी १७४०/रु असा एकुण ११७४०/रु मुददेमाल जप्त केला.

दि. १९/१०/२०२२ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथे नमुद इसम अनिल पंजाबराव तायडे रा. लहुजी नगर वाशिम ऑनलाईन चकी खेळत असतांना वापरण्यात येणारे साहित्य LEDस्कीन, CPU किबोर्ड, रेगझिन चार्ट असा साहीत्य कि. १८७०० रु व नगदी २३१०/रु असा एकुण २१०१०/रु माल जप्त केला. दि.१९ / १० / २०२२ रोजी पो.स्टे. वाशिम शहर हददीत नमुद इसम हरी भगवान खंदारे रा. गवळीपुरा चौक

वाशिम हाऑनलाईन चकी खेळत असतांना वापरण्यात येणारे साहीत्य LED स्कीन, CPU, UPS, माउस, किबोर्ड असा साहीत्य कि. २३१०० रु व नगदी १९९०/ रु असा एकुण २५०९०/ रु चा मुददेमाल जप्त केला. वरील नमुद प्रमाणे पो.स्टे. मालेगाव, पो.स्टे. वाशिम शहर येथे अवैध चकी खेळत असणारे ३ इसम यांच्या

विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदान्वये कार्यवाही करण्यात आली असुनसदर कार्यावाही मध्ये एकुण ५७८४० / रु चा माल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल मोहनकर, सुनिल पवार, पोना, प्रशांत राजगुरु, राजेश
राठोड, पोका डिगांबर मोरे यांनी सहभाग नोंदविला आहे.

Post a Comment

0 Comments