Ticker

6/recent/ticker-posts

कुस्ती मध्ये सुवर्ण पदक प्राप्त पैलवानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सत्कार


प्रतिनिधी । कारंजा (लाड) 

अमरावती विभागीय पोलिस कुस्ती स्पर्धेत वाशिम पोलीस दलात कार्यरत बब्बू पटेल, शेरू गारवे, रफीक मांजरे यांनी सुवर्ण पदक पटकावले असून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मो.युसुफ पुंजानी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सत्कार करण्यात आले आहे. 
स्थानिक पुंजानी कॉम्प्लेक्समध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस नेते मो. युसूफ पुंजानी हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, गवळीपुरा आखाड्याचे उस्ताद कासम रेघीवाले, माजी उपाध्यक्ष जुम्मा पप्पुवाले, शकील शेख, भोजा पहिलवान, वाहिद शेख, बार अससिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभान खेतीवाले, प्रा. सय्यद सलमान आदींची उपस्थिती होती. या यावेळी कुस्तीमध्ये सुवर्णपदक प्राप्त बब्बू रहेमान पटेल, शेरू रन्नू गारवे, रफीक बाबू मांजरे आदी पैलवानांचा शिल्ड, शाल व पुषपगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच जिल्हास्तरीय शिक्षक क्रीडा स्पर्धेमध्ये १०० मीटर धावणे, भाला फेक व गोळा फेक मध्ये सुवर्ण पदक प्राप्त युसुफ खेतीवाले यांचा ही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सलीम गारवे, जाकिर शेख, सलीम प्यारेवाले,अ. एजाज , जावेदोद्दीन इस्लामोद्दिन, सय्यद मुजाहिद, मुजाहिद खान, मक्खन प्यारेवाले, सिकंदर खान आदींसह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ॲड. फिरोज शेकुवाले यांनी तर आभार हमीद शेख यांनी मानले. 


Post a Comment

0 Comments