Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकात शिक्षण सुर्याला अभिवादन

 मंगरूळपीर शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकात सायंकाळी सात वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम क्रांतीसुरवेच्या प्रतिमेला हार घालून उपस्थित समाजबांधवांनी अभिवादन केले त्या नंतर आपापले विचार प्रगट करत राजेश मानेकर म्हणाले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरावांचे विचार अंगी करण्याची ही आजची गरज आहे आज शिक्षणाचे खरे हकदार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आहेत महात्मा ज्योतिबा फुलेंना भारतरत्न घोषित करावं व सरकारने हे केलच पाहीजे यासाठी लवकरच माळी समाज बांधवांच्या वतीने पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी एक स्वाक्षरी अभियान राबवू मोहन राऊत यांनी आपले विचार व्यक्त करताना वाशिम येथील उड्डाणपुलाला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उड्डान पुल असे नाव देण्यात यावे कारण महात्मा जोतिबांचे कार्य हे अगणित आहे.
 पत्रकार अशोक राऊत यांनी आपले विचार व्यक्त करताना शिवजयंती चे खरे हकदार महात्मा ज्योतिबा फुले आहे सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंती साजरी केली शिवजयंती साजरी करत असतांना महात्मा फुलेंचीही प्रत्येक कार्यक्रमात प्रतिमा असावी महात्मा फुले यांनी केवळ महिलांच्या शिक्षणासाठीच कार्य केले नाही तर समाजात पसरलेली जातीव्यवस्था अस्पृश्यता आणि धार्मिक कट्टरता यांच्या विरोधात त्यांनी लढा दिला गरीब आणि दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाज याची स्थापना केली.
 ज्योतिबा फुले यांच्या निस्वार्थ समाजसेवेसाठी 1888 मध्ये मुंबईत एका विशाल जाहीर सभेत त्यांना महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक कट्टरता स्त्री पुरुष समानता स्त्री शिक्षण या कार्यासाठी वाहून घेतले मंगरूळपीर शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानात लवकरच 21 फुटाचे भव्य दिव्य तैलचित्र लावण्याचा सुद्धा त्यांनी यावेळी संकल्प केलाय या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाचे पीएसआय शेंबडे, पीएसआय अंकुश वळतकर तथा श्री संत सावता माळी मित्र मंडळाचे  राजेश मानेकर,पत्रकार अशोक राऊत,मोहन राऊत, वासुदेव शिरसागर ,दिनकर डोंगरे राहुल राऊत, निलेश ढोमणे अजय मानेकर सतीश राऊत,सागर शिरसागर महादेव राऊत राजेश मांडवगळे कृष्णा बोबडे सुरेश राऊत सतीश राऊत विनोद राऊत सचिन सोळंके सचिन सुर्वे मोहन वानखडे सुधीर ठाकरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन राजेश मानेकर तर आभार प्रदर्शन मोहन राऊत यांनी मानले

Post a Comment

0 Comments