Ticker

6/recent/ticker-posts

बाकलीवाल विद्यालयात एनसीसी रेझिंग डे निमित्त विविध उपक्रम


वाशिम - ११ महाराष्ट्र बटालियन अकोल्याचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी यांच्या मार्गदर्शनात व एनसीसी ऑफिसर अमोल काळे यांच्या नेतृत्वात २७ नोव्हेंबर रविवार रोजी श्री बाकलीवाल विद्यालयात राष्ट्रीय कैडेट कोर (एनसीसी) चा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

    यानिमित्त शालेय परिसरात विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामध्ये पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांमध्ये एनसीसी विभागाच्या ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक वेदांती वाघ, द्वितीय नंदिनी वानखेडे, तृतीय रोशनी खंडारे, रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तृप्ती वानखेडे, द्वितीय दिशा व्यवहारे, तृतीय ऋतिका शेळके, गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रियंका कवळकर, द्वितीय क्रमांक कृष्णकांत चिपडे व तृतीय शासन बल्लाळ याने पटकावला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरविण्यात आले.तसेच एनसीसी दिवसानिमित्त सार्जेन्ट क्षितिज उल्हामाले याने शिवाजी ट्रैकिंग कैम्प कोल्हापुर येथील ट्रेकिंगवर २० कि.मी. रोज चालून ८ दिवस  केलेल्या विशेष कार्याकरिता पदक देऊन गौरविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी एनसीसीची प्रतिज्ञा घेतली. परिसरात  रांगोळीच्या माध्यमातून एनसीसी लोगोची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. 
दरम्यान रेझिंग डे मध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतूक केले.

Post a Comment

0 Comments