वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्राम पंचायतींच्या सोमवार २८ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीत निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. या कार्यक्रमानुसार वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. तसेच २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या
कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. या अर्जाची छाननी ५ डिसेंबर रोजी होईल. सदर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळेसही सरपंचपदाची थेट जनतेतून निवड होणार आहे. त्यामुळे गावाचा कारभारी होण्यासाठी अनेक गाव पुढाऱ्यांनी गुढघ्याला बाशिंग बांधले आहे. त्याच प्रमाणे महिला आरक्षीत जागेवर निवडणूक लढविण्यासाठी महिलांनी देखील कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
त्रस्त झालेली जनता यावेळेस मात्र काम न करणाऱ्यांना निवडून देणार नाही असे जनसामान्यात बोलले जात आहे. बऱ्याच काही ग्रामीण भागातील भांडखोर राजकारण्यांनी आपल्या सत्यपाही गावाचे अनेक धिंगाणे दिंडोरे काढले आहे. अशांना मात्र यावेळी जनता जनार्दन मतदार राजा जागा दाखवणार आणि काम करणारेच उमेदवार निवडून देणार असल्याचे जनसामान्यात बोलले जात आहे.
• मतमाजणा २० डिसेंबर
सरपंच पदासाठी रस्सीखेच!
सरपंच पदासाठी उमेदवारी मिळावी व्याकरीता इच्छुकांनी स्थानिक पॅनल, आघाडी प्रमुखांकडे साकडे घातले असून, उमेदवारी नेमकी कोणाला द्यावयाची व कोणाला प्रतिक्षेवर ठेवायचे, याचा निर्णय घेताना गावपुढाऱ्यांची दमछाक होत असल्याची माहिती आहे.
0 Comments