वाशिम - स्थानिक आयुडीपी कालॅनीतीन सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धा, भाषणे व संविधान रॅलीत सहभाग घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे तर अंकुश आंबटपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संविधान दिनानिमित्त आयोजीत वक्तृत्व स्पर्धेत कॉलेजच्या २६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत संविधान दिनाचे महत्व विषद केले. अध्यक्षीय भाषणातून लॉ. वसंतराव धाडवे यांनी संविधानाचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञा २२ पैकी ५ जरी प्रतिज्ञा आपल्या जीवनामध्ये अमलात आणल्या तर निश्चितच विद्यार्थ्यांचे स्वकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधेचा फायदा घेऊन तसेच अभ्यासात प्रगती करून उत्कृष्ट परिचारिका बनावे.जेणेकरून स्वतः, स्वतःचे, आईवडिलांचे व कॉलेजचे नाव उज्वल होईल. कॉलेजमध्ये ६ डिसेंबर पर्यंत सामाजिक न्याय पर्व म्हणून साजरे करण्यात येणार असून त्यामध्ये निबंध स्पर्धा प्रश्नमंजुषा सामान्य ज्ञान लेखी परीक्षा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन केेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा पाढे, सीमा मुकाडे यांनी, प्रास्ताविक विकास खंडारे याने तर आभार प्रदर्शन पल्लवी ताटेवार यांनी केले.

0 Comments