Ticker

6/recent/ticker-posts

मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात शेअर मार्केटवर कार्यशाळा संपन्न


 मातोश्री शांताबाई कोठे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून शेअर मार्केट या विषयावर  वाणिज्य विभाग व राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य  विलास गायकवाड हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिशा  राजे  या होत्या प्रमुख अतिथी म्हणून प्रा हर्षवर्धन शृंगारे डॉ दिलीप लांजेवार संजय गोटे यांची उपस्थिती होती.  आपल्या मार्गदर्शनात दिशा राजे यांनीशेअर बाजार हा कोणत्याही विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग असतो. देशातील उद्योग व्यवसायांना चालवण्यासाठी लागणारा पैसा जमवण्याकरिता कंपन्या शेअर बाजारात येतात. शेअर चा अर्थ असतो भाग शेअर बाजार मध्ये शेअर विकत घेणे म्हणजे कोणत्याही कंपनीचा भाग विकत घेणे होय. यात गुंतवणूकदार काही पैसे कंपनीला देतो त्याबदल्यात कंपनी त्याला हिस्सेदारी देते. जर कोण्या एका कंपनीचे 100 शेअर्स आहेत आणि तुम्ही त्यातील एक शेअर विकत घेतला तर कंपनीत तुमची एक टक्का  हिस्सेदारी होऊन जाते आणि जर भविष्यात कंपनीला फायदा झाला तर कंपनीच्या शेअर्सचे भाव वाढतात, व जर त्या काळात तुम्ही शेअर विकले तर तुम्हाला ही नफा मिळतो.

 

शेअर मार्केट च्या मदतीने सामान्य मनुष्य सुद्धा मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी मिळवू शकतो. एक अशी जागा जिथे बरेच लोग पैसे कमवतात तर बरेच लोक आपले पैसे गमावून पण टाकतात. शेअर मार्केटमध्ये आर्थिक जोखीम असते, म्हणून नवीन लोकांना  ट्रेडिंग करण्याची सल्ला दिली जाते. जे लोक जोखीम घ्यायला तयार असतील त्यांनीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी असे सांगितले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती भालेराव  यांनी केले.  संचालन प्रियांका बरखाम यांनी केली.   उपस्थितांचे आभार  शिवानी बयस यांनी मानले. याप्रसंगी राष्ट्रीय  सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. व्ही. बि.चांदजकर, प्रा वैशाली गोलाईत, प्रा बोरकर, प्रा नयना मोतुळे, ऐश्वर्या गनोदे, प्रा अंकिता वानखेडे, प्रा अनिल ठाकरे, गणेश  मुगवानकर, यांची उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील पट्टेबहादूर  यांच्यासह वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments