Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरती कार्यशाळेचे आयोजन

प्रतिनिधी । कारंजा
आजच्या स्पर्धात्मक युगात युवकांना रोजगार मिळविण्यासाठी विविध क्षेत्रात स्पर्धा करावी लागत आहे.या स्पर्धात्मक युगात ग्रामीण व स्थानिक युवकांना सुद्धा संधी मिळावी, युवक स्पर्धा परीक्षेत टिकावा व त्यांना  रोजगार उपलब्ध व्हावा या उदात्त हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी यांच्या सामाजिक भावनेतून २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता  स्थानीय पुंजानी कॉम्प्लेक्स हॉल येथे एक दिवशीय पोलीस भरती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेत प्रसिद्ध पोलीस भरती मार्गदर्शक प्रा सय्यद सलमान पुसद हे उपस्थित युवकांना पोलीस भरती संबंधीत अभ्यासक्रम,पूर्व तयारी,विविध समस्या व युवकांच्या अडचणी या बाबत मार्गदर्शन करतील,यावेळी रांका नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी सह कारंजा नप माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके,युवा नेते देवव्रत डहाके प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.तरी या पोलीस भरती कार्यशाळेचा स्थानिक व परिसरातील युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन माजी नप उपाध्यक्ष शकील शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.कार्यशाळेत येणाऱ्या युवकांना पेन व नोटबुक निःशुल्क देण्यात येईल

Post a Comment

0 Comments