मंगरुळपीर दि. 27 वाशिम क्रिडा संकुल मैदान येथे दि १० फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी ११ वाजता सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या विवाह सोहळ्यात ५०० च्यावर लेकीचे कन्यादान होणार आहे या विवाह सोहळ्याते अधिकाधिक वधुवरांनी आपली नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन जनसेवक संजु आधार वाडे यांनी दि27 रोजी केले आहे.
यावेळी जनसेवक संजु आधार वाडे म्हणाले, सामुदायीक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याकरिता मध्या 52 जोडण्याची नोंदणी झाली आहे तर 71 या स्थितीत व्यक्तीनी वा विवाह सोहळ्या संदर्भात विचारणा केली आहे सध्यास्थितीत या विवाहसोहळ्याच्या आयोजनाची जय्यत सुरु झाली असुन या विवाह सोहळ्याला मा मुख्यमंत्री मा. उपमुख्यमंत्री, व नरेंद्र महाराज व याशिवाय सुप्रसिद्ध सिनेअभिनेते हजेरी लावणार आहे या सोहळ्यात मुलीका साडीचोळी, मंगळसूत्र, पाच गृहपयोगी भांडी, तसेच मुलाला ड्रेस, शूज दिला जाणार आहे या विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती राहणार आहे हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. याशिवाय वाशिम व मंगरुळपीर संपूर्ण जिल्हयात या विवाह सोहळ्यासंदर्भात माहिती दिली जात आहे. तसेच गावालीक शाळेमधून गणित विषयाचे अबकस अँप विषयी माहीती दिली जात आहे. या निमित्ताने मंगरूळपीर तालुक्यातील पत्रकार बांधवांची आज उपस्थिती लाभली होती. यादरम्यान सर्व पत्रकार मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
0 Comments