कलावंतांच्या मानधनवाढीसाठी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी घ्या - संजय कडोळे
एकविरा मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्धतेचे आ. पाटणी यांचे आश्वासन
कारंजा - विदर्भ लोककलावंत संघटना आणि संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या आयोजनातुन गुरुनगरी कारंजा येथे ३ डिसेंबर रोजी वारकरी मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हभर श्रीकृष्ण महाराज राऊत तर उद्घाटक म्हणून आ. राजेंद्र पाटणी यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक, अभिनेत्री आसावरी तिडके, अभिनेते नरेश गडेकर, माजी नगराध्यक्षा उर्मिलाताई इंगोले, सौ. आशाताई गाडगे, स्वागताध्यक्ष जयकिसन राठोड, नारायणराव काळबांडे, भुजंगराव वाळके, राजेंद्र मोडक, अ. भा. नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य उज्वल देशमुख, सौ सुधाताई चवरे, आयोजक संजय कडोळे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी दिपप्रज्वलन, महापुरुषांचे पुजन, जिजाऊ वंदना, एकविरा माता दिनदर्शिकेचे प्रकाशन पार पडले. मान्यवरांच्या स्वागतानंतर अभिनेत्री आसावरी तिडके यांना अभिनय सम्राज्ञी, नरेश गडेकर यांना अभिनय सम्राट, पंकजपाल महाराज, उज्वल देशमुख, सत्यपाल महाराज, प्रदिप देशमुख, प्रदिप वानखडे, नंदकिशोर कव्हळकर, पत्रकार विश्वनाथ राऊत, किरण क्षार, एकनाथ पवार, सुनिल फुलारी, विजय खंडार, सुधाकर चौधरी, अरुण राऊत, निलेश सोमाणी, जिनवर तायडे, आरिफ पोपटे, मोहम्मद मुन्नीवाले, दामोदर जोंधळेकर, विनोद गणविर, इम्तियाज लुलानिया, तारासिंग राठोड, आय. के. परमार, रोमिल लाठिया, सुनिल गुंठेवार, अरुण घोडसाड, डॉ. ज्ञानेश्वर गरड, धनराज महाराज जाधव, किशोर धाकतोड, अॅड. संदेश जिंतुरकर, अॅड. दिंगबर पिंजरकर, डॉ. मुजफ्फरखान, किर्तनकार हभप कु. चित्राताई वाकोडे, मोनाली गणविर, सुनिता मेहसरे, छाया गावंडे, प्रणिता दसरे आदींना यांना संत नामदेव तुकाराम सेवाव्रती वारकरी पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्यानंतर श्री एकविरा माता संस्थानच्या भव्य प्रांगणात वारकरी मेळावा घेण्यात आला. प्रारंभी महाराणा प्रताप चौक, श्री कामाक्षा देवी मंदिर, गुरुमंदिर, एकविरा देवी मंदिरापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीमध्ये आसावरी तिडके, नरेश गडेकर, आ. राजेंद्र पाटणी, आ. अॅड. किरणराव सरनाईक, उज्वल देशमुख, स्वागताध्यक्ष जयकिसन राठोड पायी चालत गेले. तसेच लोहारा, वडगाव इजारा येथील बंजारा भजनी मंडळाच्या महिलांनी पारंपारीक पेहरावात सहभाग घेतला. मेळाव्याच्या दुसर्या सत्रात हभप कु. चित्राताई महाराज वाकोडे यांचे किर्तन व वारकरी मंडळीकरीता आयोजित महाप्रसादाचा पंचक्रोशीतील हजारो भाविक मंडळीनी लाभ घेतला.
कार्यक्रमात अभिनेत्री आसावरी गडेकर यांनी संत गजानन शेगावीचे मालिकेतील संवाद म्हणून दाखविताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. मनोगत व्यक्त करतांना संजय कडोळे यांनी वाढत्या महागाईला अनुसरून येत्या हिवाळी अधिवेशनात वृद्ध साहित्यीक योजनेचे मानधन सांस्कृतिक विभागाकडून वाढवून पाच हजार रुपये करण्याबाबत आपण लक्षवेधी सूचना मांडून प्रस्ताव पारित करण्याची मागणी आ. सरनाईक व आ. पाटणी यांच्याकडे केली. यावेळी आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करुन कलावंतांचे मानधन वाढवून घेण्याबाबत आ. पाटणी यांनी आश्वासन दिले. तसेच सत्यजित गाडगे, आशाताई गाडगे, उर्मिलाताई इंगोले यांच्या मागणीवरून आई एकविरा देवी संस्थानला सुसज्ज सभागृह, वॉल कंपाऊडसाठी भरघोस निधी देण्याचेही आ. पाटणी यांनी आश्वासन दिले. आ. अॅड. सरनाईक यांनी सुद्धा विधान परिषदेत कलावंत योजनेच्या मानधनाबाबत सांस्कृतिक मंत्रालयाच्या बैठकीत लक्ष्यवेधी मांडण्याचे अभिवचन दिले. हभप लोमेश महाराज चौधरी यांनी दिव्यांग व बेघर असलेल्या संजय कडोळे यांना घरकुल उपलब्ध करून देण्याची आ. राजेंद्र पाटणी यांचेकडे मागणी केली. अध्यक्षीय भाषणातून हभप श्रीकृष्ण महाराज राऊत यांनी आयोजक संजय कडोळे यांच्या निःस्वार्थ कार्याचे कौतूक केले व संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सांस्कृतिक विभागाचे कारंजा तालुकाप्रमुख म्हणून निवडीचे पत्र देवून त्यांचा सत्कार केला. संचलन प्रणिता दसरे यांनी व आभार प्रदर्शन नंदकिशोर कव्हळकर यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. इम्तियाज लुलानिया, नंदकिशोर कव्हळकर व मित्रमंडळी यांनी आर्थिक सहाय्य दिले. मेळाव्याला जिल्हाभरातून कलावंत, वारकर्यांसह नागरीक बहूसंख्येने उपस्थित हेाते.
0 Comments