गणित विषयाची विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच गोडी लागावी व त्यांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी या उद्देशाने जनसेवक संजूभाऊ आधार वाडे यांनी अबॅकस ऍप ची निर्मिती केली आहे. समाज उपयोगी उपक्रमांतर्गत त्यांनी हे ॲप जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकत असणाऱ्या मुलांना मोफत देण्याचा संकल्प केला आहे. अबॅकस च्या आठ लेवल या माध्यमातून पूर्ण करता येणार आहेत .ज्यामुळे विविध क्लुप्त्या वापरून कमीत कमी वेळात विद्यार्थ्यांना गणित सोडवण्याचे कौशल्य प्राप्त होणार आहे. आज जि. प. शेलुबाजार शाळेत जनसेवक संजू भाऊ वाडे यांनी या ॲपच्या निर्मिती मागील उद्देश व वापरा संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन केले. सदर ॲप विद्यार्थ्यांना मोफत इन्स्टॉल करून दिले .
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशभाऊ बोबडे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबारावभाऊ पवार ,समाजसेवी व्यक्तिमत्व रविभाऊ लांभाडे, राजूभाऊ वाडेकर ,केंद्रप्रमुख गोपनारायण साहेब तसेच माता व पुरुष पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.याप्रसंगी शेलुबाजार येथील विद्यार्थी जय राजू वाडेकर याने नवोदय विद्यालयात असतानाच एन. टी. ए.मार्फत घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत राज्यातून पहिला येण्याचा मान मिळवल्याबद्दल त्याचे मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा याची प्रेरणा घेऊन असेच दैदिप्यमान यश संपादन करून पुढे जावे असे आवाहन मान्यवरांनी याप्रसंगी केले . जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मांगाडे मॅडम व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
0 Comments