वाशिम जिल्ह्यातील माळी समाजाचे झुंजार युवा नेतृत्व गोरगरिबाच्या हाकेला धावून जाणारे
पांडुरंग भाऊ कोठाळे यांची
बिड येथे नुकत्याच झालेल्या सावता परिषदेच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली ५ व ६ डिसेंबर रोजी बिड येथे दोन दिवसीय प्रदेश कार्यकारणी बैठक पार पडली. यात दि. ६ डिसेंबर रोजी परिषदेच्या नवीन कार्यकारिणी निवडण्याच्या प्रक्रियेत सहभागी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष, युवक अध्यक्ष, महीला आघाडी अध्यक्षा यांनी कार्यकारिणी निवडीचे अधिकार संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांना दिले. त्यावेळी त्यांनी निवडलेल्या नविन कार्यकारिणीत वाशिम जिल्ह्यातील माळी समाजाचे झुंजार युवा नेतृत्व पांडुरंग रामचंद्र कोठाळे यांच्या वर प्रदेश उपाध्यक्षपदाची जवाबदारी कल्याण काका आखाडे यांनी समाजाप्रती असलेली निष्ठा व आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती म्हणून ही जबाबदारी देण्यात आली या निवडीबद्दल पांडुरंग कोठाळे यांच्यावर शुभेच्छा वर्षा होत आहे . ही निवड सार्थ ठरविण्यासाठी आगामी काळात
वाशिम जिल्हा सह विदर्भातील सर्व जिल्हा मध्ये सावता परिषदेचे संघटन मजबूत करण्यासाठी तळागाळातील नागरिकांना सोबत घेऊन आपण मेहनत घेणार असल्याचे पांडुरंग कोठाळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
0 Comments