Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम दस्तापुर येथे दरवर्षी प्रमाणे लग्न सोहळा पार पडला .


गेल्या २४ वर्षापासून मेळाव्याची प्रथा असून हुंडा पद्धती ला गावकऱ्यांनी तिलांजली दिली असून मोठ्या दिमाखात आज ही लग्न सोहळा थाटामाटा पार पडतोय या मेळाव्यासाठी सोलापूर पंढरपूर सातारा, सागली, इचलकरंजी नाशिक परभणी अमरावती अकोला अशा अनेक ठिकाण हून सगे सोयरे नातेवाईक यांनी हजेरी लावून वधूवरांना शुभ आशीर्वाद दिला .
या सोहळ्या मध्ये चार जोडप्यांचा समावेश होता .
 गरीब   बाप्पांनी राबराब राबून पाठी वर पोते घेऊन हमाली करणारा बाळू पुंडलिक  निमग्रे यांनी आपल्या तिन्ही मुलीचे कन्यादान केले.
तसेच संपूर्ण आयुष्य काबाडकष्ट करण्यात  हमाली करत ट्रक ड्रायव्हर असलेल्या भागाप्पा रामकृष्ण शिंदे यांनी आपल्या  मुलीचे कन्यादान केले.
पार पडलेल्या विवाह सोहळ्यामध्ये या मुलींचे गटबंधन अनिशा हिचा तुळशीदास कचरू खांडेकर, यांच्याशी तर भाग्यश्री हिचा निखिल संतोष गळवे  वृषाली हिचा सुरज लक्ष्मण आटपाडकर यांच्या सोबत झाले तर नेहा भागाप्पा शिंदे हीच आकाश घनशाम मुंजे यांचे सोबत गटबंधन होऊन विवाह पार पडला.
गेल्या २०० ते २५० वर्षांपूर्वी वाशिम जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या लोकांनी एक ठुमकदार गाव निर्माण केले त्या गावाचे नाव दस्तापुर व हातात पडेल ते काम करत त्यांनी गावाला नंदनवन केले या गावाला हरितसंजीवनी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे साहेब यांनी गतवैभव तयार करून या गावाला सुजलाम सुफलाम. बनविण्या साठी मोलाचे  कार्य केले .
मनमिळावू दख्खन पठारातील लोकांना सार्थ साथ दिली आज या गावांमध्ये बरेचशे मुलं नोकरीवर सुद्धा लागले आहेत क डॉक्टर इंजिनियर  प्रोफेसर  एअर फोर्स , आर्मी  पोलीस , एस आर पी ,सी आर पी  फॉरेस्ट ,तर शिक्षक अशा अनेक व हुद्या वर आज मुले कर्तव्य बजावतात 
या लग्न सोहळ्यासाठी राम सुभाषराव ठाकरे, सुधाकर मामा करचे,  के. ट्टी.मुंजे सर प्रकाश नरळे  तहसीलदार दिग्रस   दत्तात्रेय कुठे परमेश्वर खैरावकर बाबुराव नरळे सर,फिरोज मोहना वाले, गिरीश बाहेती नरेश बाहेती, भाई गजानन राऊत, सुभाष खांडेकर, भागवत पाटील सनगाव मुन्ना लोहिया सह मंगरूळपीर बाजार समिती व शेलुबाजार बाजार समिती तील  सर्व सहकारी बांधव,व नातेवाईक  कासोळा ,धानोरा खुर्द ,सावरगाव बंगला, पुसद . दिग्रस,उमरखेड करोडी , देऊळगाव साखरशा,व खेड्यापाड्यातील अनेक मान्यवरांनी वधू वर यांना शुभ आशीर्वाद देऊन हजेरी लावली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक,सह पुणे येथील सर्व ड्रायव्हर बांधव, कर्मचारी वर्ग,
   ग्रामीण युवक मंडळ युवकांनी व गावकरी मंडळींनी विवाह पार पाडण्या साठी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments