Ticker

6/recent/ticker-posts

श्याम प्रजापतींसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध.

राज्यपाल भगतसिंग कोशारीच्या ताफ्यासमोर करणार होते आंदोलन
अमरावती : काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना अमरावतीत येऊ नये, आल्यास त्यांना अमरावतीकर नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा दिला होता. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी प्रजापतीसह शेकडो कार्यकर्त्यांना शनिवारी दुपारी दिड वाजता वेलकम पॉइंट येथून स्थानबद्ध करत गाडगे नगर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले आहे. या कारवाईला प्रजापती यांनी विरोध दर्शवीत देशात लोकशाही आहे, त्यामुळे संविधानाने प्रत्येकाला संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र पोलिसांकडून सुरू असलेली दडपशाहीची भाषा अयोग्य आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Post a Comment

0 Comments