वाशिम ,
जिल्ह्यात सामाजिक न्याय पर्वानिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.जागतिक दिव्यांग दिवसाचे निमित्ताने आज ३ डिसेंबर रोजी निवासी मूकबधीर विद्यालय अनसिंग येथे दिव्यांग नागरिकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रभारी सहाय्यक सल्लागार श्रीमती ए.ए.राऊत,संस्थेचे सचिव चंद्रकांत देवळे,मुख्याध्यापक श्री कोल्हे,वाचा उपचार तज्ञ किर्ती कावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यशाळेत श्रीमती राऊत यांनी दिव्यांग नागरिकांसाठीच्या विविध शासकीय योजना व मिळणारा लाभ या विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच दिव्यांग अधिनियम २०१६ चे वाचन यावेळी करण्यात आले .
0 Comments