Ticker

6/recent/ticker-posts

खासदार भावनाताई गवळी यांना निवेदन क्रीडा संकुल मैदानावर प्रकाशाकरीता

क्रीडा संकुल मैदानावर प्रकाशाकरीता दिव्यांची (पथदिवे/स्ट्रीटलाईट) ची व्यवस्था करणेबाबत.* *संजू आधार वाडे विचार मंच चे अध्यक्ष दीपक वाडे व उपाध्यक्ष शेख नवेद.यांनी खासदार भावनाताई गवळी ला निवेदन

 दी,3 मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या समोरील 'तालूका क्रीडा संकुल क्रीडांगण' व त्यामागील 'जि.प. क्रीडांगणात' सध्या पोलीस भरती, आर्मी, नेव्ही वा इतर भरतींच्या शारीरिक चाचणीची रात्रंदिन तयारी करणारे शहरातील व एकंदरीत तालुक्यातील बहूसंख्य युवक, युवती दिसतात.
                      सदर युवक, युवती पोलीस भरती व इतर भरतींकरीता शारीरिक चाचणीतील विविध बाबी जसे - धावणे, लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, इ. शारीरिक कौशल्यांचा रात्रंदिन सराव करीत आहेत. त्याकरीता ते खूप मेहनत घेत आहेत. या युवकांची मेहनत, जिद्द, व चिकाटी पाहता त्यांना अपेक्षित यश मिळो, ही सदिच्छा देऊया.
                    परंतु, त्यांचा शारीरिक कौशल्यांचा सराव पाहता असे लक्षात आले की, हे युवक, युवती रात्री अंधारात, सकाळी लवकर उठून व रात्री उशिरापर्यंत ते आपला सराव करतांना दिसतात. या ठिकाणी सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते. अंधारामूळे एखाद्या सराव करणाऱ्या युवक, युवतींना इजा होणे, अपघात होणे वा एखादी विपरीत गोष्ट घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर ठिकाणावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था केल्यास या बाबी टाळता येवू शकतात.
                        त्यामुळे या निवेनाद्वारे आपणास विनंती करण्यात येते की, क्रीडा संकुल च्या भिंतीवर, सुरक्षा भिंतींवर पथदिव्यांप्रमाणे दोन्ही बाजुंना प्रकाशाचे दिवे असणारे खांब उभे करून दिव्यांची व्यवस्था करावी, जेणेकरून या भावी पोलीस व जवानांना आज सराव करण्याकरीता कुठलीही अडचण/ बाधा येणार नाही. व त्यांच्या सरावात अधिक वेळ व सातत्य येवून त्यांना निश्चित पूर्णपणे मदत होईल. त्याकरीता आपण या ठिकाणावर तात्काळ विजेच्या दिव्यांची व्यवस्था करावी, ही या निवेदनाद्वारे विनंती.
                         आपण या निवेदनाची दखल घेऊन याबाबत त्वरित कार्यवाही करावी, ही विनंती.

Post a Comment

0 Comments