Ticker

6/recent/ticker-posts

घरोघरी मा जिजाऊ झाली पाहिजे नारायण महाराज शिंदे

घरोघरी मा जिजाऊ झाली पाहिजे नारायण महाराज शिंदे
वर्ल्ड स्पीड न्यूज वाशिम खबर            आवाज महाराष्ट्राचा

लव्ह जिहाद सारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुलींना शिक्षणा सोबत सुसंस्काराची गरज आहे आणि त्यासाठी घरोघरी मा जिजाऊ झाली पाहिजे तसेच हिंदूंचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्रवीर सावरकर,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि इतर आदर्शांचा अपमान हिंदू समाज सहन करणार नाही असे प्रतिपादन ह.भ.प.नारायण महाराज शिंदे यांनी
मंगरुळनाथ येथील विश्व हिंदु परिषदच्या वतीने आयोजीत धर्मसभे प्रसंगी उपस्थीत जन समुदाया समोर केले.धर्म सभेच्या पुर्वी जि.प.शाळेच्या मैदानातुन मातृशक्ती च्या पुढाकारात दि.४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३०वाजता भव्य शौर्य यात्रा रॅली
छत्रपती शिवाजी महाराज चौक,बिरबलनाथ मंदीर,वीर भगतसींग चौक,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
चौक या मार्गाने परत जि.प.मैदानात आल्या नंतर धर्म सभा संपन्न झाली.
सभेच्या अध्यक्ष स्थानी वि.हिं.प.केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे सदस्य ह.भ.प.नारायण महाराज तर प्रमुख वक्ते म्हणुन विदर्भ प्रांत धर्मप्रसार सह प्रमुख अटल पांडे व अतिथी म्हणुन वि.हि.प.वाशिम जिल्हाध्यक्ष डाॅ.अमित चव्हाण यांची उपस्थिती होती. शौर्य दिनावर बोलताना अटल पांडे यांनी दिनांक 6 डिसेंबर 1992 रोजी हिंदु समाजाने पाचशे वर्षाचा कलंक नष्ट केला व आज भव्य राम मंदिर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तयार होत असल्याचे प्रतिपादन केले
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापने मागील उद्देश व संघटनेची आवश्यकता त्यांनी आपल्या उद्बोधनातून विशद केली गिता जयंती विषयावर
विस्तृत मार्गदर्शन केले.
शौर्य यात्रा रॅली मध्ये हजारो महिला व पुरुषानी सहभागी होवून एकजुट दर्शविली.कार्यक्रमाचे
संचालन व प्रास्तविक जिल्हा विहिपचे जिल्हा मंत्री सतीश हिवरकर यांनी केले.आभार प्रदर्शन दिनेश वाघ यांनी तर पसायदान गणेश ढगे यांनी
गायिले.या कार्यक्रमासाठी,वि.हि.प.       राष्ट्रीय स्वयं सेवक संघ,बजरंग दलाचे कार्यकर्ते,तसेच समस्त हिंदु संघटनां व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments