मोठी बातमी! महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान IPS विश्वास नांगरे पाटील यांना बढती, पदोन्नती नंतर ‘या’ विभागाचं कामकाज पाहणार
मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची सुद्धा बदली करण्यात आली आहे.
मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांचं प्रमोशन झालेलं असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ते अपर पोलिस महासंचालक झालेले आहेत. विनयकुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर नांगरे पाटलांची वर्णी लागली आहे.हेही वाचाः इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....
यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही समावेश असून त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली आहे. गुप्ता यांच्या जागी आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत. यासह मीरा भाईंदर, वसई-विरारचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची बदली मुंबईच्या दहशतवादी पथकात झाली आहे. ते अपर पोलिस महासंचालक म्हणून पदभार सांभाळतील. मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांचं प्रमोशन झालेलं असून ते नवी मुंबईचे पोलिस आयुक्त झाले आहे.
0 Comments