"संत नामदेव-तुकाराम वारकरी मेळाव्यात, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दिग्गज लोककलावंताची राहणार उपस्थिती
."
कारंजा : कारंजा येथील श्री एकविरा देवी संस्थान माळीपूरा येथे, शनिवार दि.3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनी होणार्या, स्थानिक विदर्भ लोक कलावंत संघटना, जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजा तथा मराठा सेवा संघ प्रणित संत नामदेव तुकाराम वारकरी मेळाव्या निमित्त, किर्तनकार हभप कु . चित्रा महाराज वाकोडे,स्थानिक आमदार राजेंद्र पाटणी, शिक्षक आमदार ऍड किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, उर्मिला बाई इंगोले, ज्येष्ठ समाजसेविका सौ आशाताई गाडगे यांचे सह मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष - नारायणराव काळबांडे, हभप श्रीकृष्ण पाटील राऊत, कारंजा अध्यक्ष भुजंगराव वाळके, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष राजेंद्र मोडक यांचेसह कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजेच आमचे खास विशेष अतिथी, शेगावीचा राणा गजानन या दूरदर्शन मालिकेच्या अभिनेत्री, झाडीपट्टी रंगभूमिच्या अभिनय सम्राज्ञी, आपल्या अभिनयातून स्मिता पाटील साकारणार्या आणि सिनेसृष्टितील प्रतिष्ठेचा स्व स्मिता पाटील पुरस्कार प्राप्त असलेल्या मराठी तारीका सौ आसावरीताई तिडके (गडेकर ) हया आणि त्यांचे नटसम्राट पुरस्कार प्राप्त पती तथा अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष असलेले प्रसिद्ध अभिनेते नरेश गडेकर, सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज, पंकजपाल महाराज राठोड हे येणार आहेत. त्यांच्या स्वागताकरीता कारंजा येथील अ भा मराठी नाटय परिषद शाखा अध्यक्षा सौ सुधाताई चवरे, नंदकिशोर कव्हळकर, केन्द्रिय कार्यकारिणी सदस्य उज्वल देशमुख, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, स्थानिक चित्रपट निर्मिती कंपनी, ईरो फिल्म एन्ड एन्टरटेन्टमेन्टचे डॉ इम्तियाज लुलानिया, रोमिल लाठीया, डॉ ज्ञानेश्वर गरड, जैन समाज संघटनेचे ऍड संदेश जिंतुरकर व समस्त कारंजेकर कलावंत, वारकरी सज्ज झाले असून सदर्हू वारकरी आणि सांस्कृतिक मेळाव्याला जास्तितजास्त वारकरी, कलारसिक मंडळीनी श्री एकविरा माता संस्थान येथे सकाळी १०:०० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन, संत नामदेव तुकाराम वारकरी मेळाव्याचे आयोजक हभप संजय महाराज कडोळे यांनी केले आहे .
0 Comments