Ticker

6/recent/ticker-posts

सुश्रुत नेत्र शल्य चिकित्सालयात आनंद उत्सव, नेत्र तपासणी शिबिर संपन्न


डॉ. जयंत अहाळे,  सौ संगीता अहाळे गरजूंना ब्लॅंकेट वाटप. आनंद उत्सव. नेत्र तपासणी शिबिर 

डॉ. सुश्रुत अहाळे,  अनुराधा सुश्रुत अहाळे, यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप

वाशिम येथील लोकप्रिय गोरगरिबांना मदत करणारे सदैव हसमुख नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर जयंत अहाळे यांच्या धर्मपत्नी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  गेली तीन वर्षापासून प्रेरणादायी आनंद उत्सव नेत्र तपासणी शिबिर, रक्तातील तपासण्या, गोरगरिबांना एक रुपया तपासणी, औषध चष्मा,व ब्लॅंकेटचा वाटप 


शिबिराची सुरुवात सकाळी आठ वाजता केक कापून करण्यात आली  तर रात्री नऊ  वाजेपर्यंत या शिबिरामध्ये 201 रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरामध्ये रुग्णांनी मोफत तपासणी करून गिफ्ट सुद्धा देण्यात आले समाधान झाल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आपण जीवनात आल्यानंतर आपल्या सोबत अनेक नातेसंबंध जोडले जातात जसे की बहिण, भाऊ, आई, वडील, मित्र- मैत्रीण मुलं मुली व पत्नी अशा विविध नात्यांचे लोक आपल्या जीवनात असतात . त्यांच्याशी आपण खूप प्रेम करतो.


वर्षभरातून एक असा दिवस असतो त्या दिवशी आपल्या जवळच्या जिवलगा चा  वाढदिवस असतो आणि तो दिवस त्यांच्यासाठी आणखीन जास्त आनंददायी आणि अविस्मरणीय कण्यासाठी आपण सतत धडपडत असतो  त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम इत्यादींच्या आयोजन करत असतो . असेच एक आगळे वेगळे शिबिर सुश्रुत नेत्रशल्य चिकित्सालय वाशीम येथे गेली तीन वर्षापासून राबविल्या जात आहे. या शिबिराचे आयोजन डॉक्टर जयंत अहाळे,  सौ. संगीता जयंत अहाळे, डॉक्टर सुश्रुत अहाळे,  सौ.अनुराधा सुश्रुत अहाळे, वाशिम शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले सध्या कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे गरजूंना ब्लॅंकेट चा वाटप सुद्ध करण्यात आला.


हे शिबिर यशस्वी करण्यासाठी  सौ. अनुराधा अहाळे,, अभिलाष जैन
कमलाकर रानाडे, तळणकर , मोहोळे,बाळु ,मुसळे, बनसोड ,बोरकर ,दिवटे
 हॉस्पिटल मधीलइ  कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले या आनंद उत्सव शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या शिबिरामुळे वाशिम जिल्ह्यात  
सुश्रुत नेत्र शल्य चिकित्सालयाचे व अहाळे परिवाराचे कौतुक केल्या जात आहे. अशा शिबिराच्या माध्यमातून गरजवंतांना फायदा होतो व तोच खरा आनंद उत्सव मानला जातो

Post a Comment

0 Comments