Ticker

6/recent/ticker-posts

शासनाच्या हुकूमशाही धोरणामुळे शिक्षण क्षेत्रावर अन्याय

विधिमंडळासमोर शाम प्रजापती कडाडले
पक्ष,संघटना भेद विसरून शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीचा विचार करणार
नागपूर : शासनाच्या दडपशाहीच्या व हुकूमशाहीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रावर सातत्याने अन्याय सुरू आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी पक्ष-संघटना भेद सर्वांनी विसरून एक दिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेत असल्याची घोषणा अमरावती काँग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी विधिमंडळासमोरील अफाट जनसमुदायाच्या मोर्चासमोर केली.
राज्य शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध मागण्यांकरिता 21 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला स्थानिक यशवंत स्टेडियम येथून सुरुवात करण्यात आली. दरम्यान हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्याम प्रजापती हे बोलत होते. प्रजापती यांनी फडणवीस-शिंदे सरकारवर हल्लाबोल चढवत राज्यात स्तोम माजून शिक्षण क्षेत्रावर अन्याय केला जात आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहोत. पदवीधर आमदार आहेत. शिक्षक आमदार आहेत, असं असतानाही शिक्षण क्षेत्राच्या समस्या सुटत नाहीत. पदवीधरांना रोजगार नाही. शिक्षकांना निलंबित केल्या जाते. जुनी पेन्शनचा मुद्दा अजूनही निकाली निघत नाही. ही गंभीर शोकांतिकेची बाब आहे. वर्तमान शिक्षक व पदवीधर दोन्ही आमदार यांच्यावर टीकास्त्र सोडताना शाम प्रजापती म्हणाले की, केवळ त्यांचा जो मतदार असेल त्यांची ते काम करतात. दुसरा एखादा माणूस समस्या घेऊन जात असेल तर त्याच्यावर अन्याय केला जातो. ही बाब लोकशाही तत्वांना कलंकित करणारी आहे. म्हणून मतदार असो अथवा नसो जात, धर्मपंथ कुठलाही असो, पक्ष कुठलाही असो या सर्वांच्या सीमारेषा मोडून आपण शिक्षण क्षेत्राच्या सर्वकश विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा शाम जगमोहन प्रजापती यांनी केली. प्रजापती यांच्या आक्रमक भाषणाला शिक्षकांनी मोठा प्रतिसाद देत त्यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी राज्य शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दिलीप कडू, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, रमेश काळे, जयंत इंगोले, अनिल भारसाकडे, श्रीकांत लाजूरकर, नंदकिशोर नवले, प्रदीप नानोटे, अविनाश कडू, काजी वजाहत अली, दिलीप शिरभाते, निशा गोसावी, श्रीकांत कडू, ज्ञानेश्वर टाले, मंगेश माहानोर, सरला महानोर, मधुकर उघडे, संजय खर्चे, सुधीर शेळके, रणधीर पावड़े, मधुकर रोडे, नितिन ठाकरे, जगदीश नेरकर, मिलिंद देशमुख, प्रसाद देशमुख, विनोद पांडे, मनोज सोलंके, संदीप आंबडकर, दीपक पूरी, रविंद्र उमप, नीलेश नागपुरे, दादाराव टवलारे, अमित बोबडे यांच्यासह शिक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--

Post a Comment

0 Comments