Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव येथील सरपंच सौ. मायाताई धोंगडे यांचे पद अपात्र

    


मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम पेडगाव येथील सरपंच सौ मायाताई अमोल धोंडगे, सचिव यांच्या विरुद्ध  अर्जदार विनोद गुलाबराव पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम1959 चे  कलम 36 प्रमाणे अर्ज दाखल केला होता. सदर अर्जांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारी 21 मध्ये झाली. गैर अर्जदार सरपंच यांनी नियमांचा भंग केला असून 28 मे 2021 रोजी मासिक सहभाग घेतली नाही. सदर सभा 31 मे 2021 रोजी ऑनलाईन घेण्यात आली नाही. मात्र त्या महिन्याची मासिक सभा आजपर्यंत घेण्यात आलेली नाही. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन ठराव पारित केला नाही. यापूर्वी गैर अर्जदार यांनी एप्रिल 2021 मध्ये मासिक सभा घेतली. अर्जदार व पाच सदस्यांनी सुचविलेल्या सरपंचांनी अजेंडावर घेतले नाही व चर्चा केली नाही. यानंतर अर्जदारांनी गट विकास अधिकारी व संबंधित समितीकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर संबंधितांनी चौकशी करून चौकशी अहवाल 31 ऑगस्ट 2021 सादर केला. सदर तपासामध्ये त्रिस समितीने गैर अर्जदार सरपंच यांनी नियमांचा भंग केल्याचा सांगून सरपंच दोषी असल्याचा अभिप्राय दिला होता. सरपंच पद रद्द करण्याची मागणी केली होती. गैरअर्जदाराने खोटे व बनावटी प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी 12 डिसेंबर रोजी अर्जदार यांचा विवाद अर्ज मंजूर केला. व गैर अर्जदार सौ मायाताई धोंगडे यांना अपात्र घोषित करण्याचा निकाला दिला. अर्जदार विनोद पवार यांच्या वतीने अँड. जयंत श्यामसुंदर यांनी बाजू मांडली. सदर निकालामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments