Ticker

6/recent/ticker-posts

स्त्रीनेच स्त्रीची उपेक्षा करू नये, कालींदी पाटील

     
आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमधे काही ठराविक काळात ठराविक सण  ठराविकच घटका सोबत साजरे केले  जातात.                                                 
महाराष्ट्रातील  विविध  सण हे महीला अती उत्साहाने साजरे करत असतात व  हे रुढीपरंपरेनुसार मागच्या काळापासूनच साजरे होत आलेले आहेत पण त्याच्या उद्देशामधे , व पद्धतीमधे मात्र  आपापल्या सोयीनुसार बराच बदल करण्यात आलेला दिसुन येतो  अशापैकीच हा मकर संक्रांत हा एक सण विशेषत्वाने साजरा केला जातो . विशेष म्हणजे महीलांनीच महीलांकरीता व महीलासोबतच साजरा होणारा हा सण म्हणजेच मकर संक्रांत . आज 15 जानेवारी ला मकर संक्रांत सण आहे पण तो या निमीत्ताने   15 दिवस दररोज अनेकांच्या घरी हळदीकुंकू कार्यक्रम म्हणुन आयोजित केला जातो. हळदी कुंकू हा कार्यक्रम आपण कशा पद्धतीने साजरा करतो हे तुम्हा सर्वानाच माहीती आहे . प्रतेक महीला ही स्वतःच्या आर्थिक ,कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीनुसार   हे कार्यक्रम आयोजीत  करत असते व त्या परिस्थितीनुसार च  ईतर महीला त्यांच्याकडून अपेक्षा करत असतात. अन त्यांच्या  गृहीत धरलेल्या अपेक्षेनुसार हा कार्यक्रम नाही झाला तर  मग त्यांची   उपेक्षा केली जाते . आपण प्रतेक वेळी पुरूषप्रधान देश ,   पुरूषप्रधान संस्कृती म्हणत असलो तरी हे असे  करण्यामधे पुरूष कुठेही  सहभाग घेत असताना दिसत नाही .याबाबत चे सर्व निर्णय हे त्या घरातील महीलाच घेत असते. तो बिचारा आदेशानुसार  पुरवठा  करण्याईतपतच  मर्यादित असतो. या कार्यक्रमात पुर्ण निर्णय महीलाचेच असतात . मग असे असताना आपण या कार्यक्रमासाठी जे जे काही करतो त्यात आपल्याच स्वजातीला, आपल्याच  विधवा भगीणीला, मग ती घरातील असेल,शेजारची असेल,गल्लीतील असेल तीला आपण कसे जाणीवपूर्वक वाळीत टाकतो . तीला यात कसलाही सहभाग आपण देत नाही कारण काय तर ती  "विधवा " आहे ??
मैत्रीणीनो यात तुमचा काही दोष नाही कारण हे तुम्ही करत नाही तर   हे पूर्वीपासून चालत आलेली ही रूढीपरंपरा  करते  बरोबर   !!! 
मग आपण या रुढीपरंपरेचा विचार करू या.. 
पुर्वीच्या काळात स्रीया या अशिक्षित होत्या, सत्य ,असत्य बाबत विचार करण्याचेही स्वातंत्र्य तेव्हा नव्हते व त्यांच्यासोबत डोक्यात घुसवलेली व लादलेली एक धार्मिक भीती नांदत होती . ती म्हणजे जर आपण रुढीपरंपरेनुसार हे नाही केलो तर आपल्यावर देव काहीतरी  संकट आणेल.अन या भीतीपोटी त्या महीला सर्व काही रुढीपरंपरेनुसारच करत असत व तसे करायला त्या काळचा सभोवतालचा समाज भाग पाडत असत.
पण आता ती परिस्थिती राहीलेली आहे का   ? यात तुम्ही तुमच्याच सोईनुसार बदल केलेत ना ? 
आता आपण अशिक्षित राहीलेलो नाहीत, सत्य असत्याचे परीक्षण आपण करू शकतो, वास्तवतेवर विचार करू शकतो.चुकीच्या रूढी ,परंपरा  बदलू शकतो , परिवर्तन घडवु शकतो , तितकी तरी क्षमता आपल्यात नक्कीच आहेत . आपण आपल्याच सोयीनुसार सगळ्याच बाबतीत वैचारीक दृष्ट्या बदललो आहोत मग ईथेच का नाही  ?? विचारा स्वतःच्या मनाला...
तीच्या पतीचे निधन झाले यात तीचा काय दोष ? ती तीच आहे ना नैसर्गिक जशी जन्मली तशी, बाकीचे हे सगळेच लेबल ,नियम,अटी, तिने काय केल पाहीजे ,काय नाही केल पाहीजे,तिच्यासोबतच्या परंपरा,हे कुणी ठरवल ? त्या काळातल्या स्वयंघोषीत उच्च स्तरातील मानवानीच ना ? वरून म्हणजे आपण मानतो त्या देवानी तर सांगीतल नाही ना विधवेशी अस वागा म्हणुन  ? मग का अस तीला वाळीत टाकतो आपण ?   बायानो थोडा विचार करा,ताण द्या बुद्धीला, ती विचार करण्यासाठीच दिलेली आहे आपल्याला हे तरी मान्य करा.
मागच्या काळातील सती जाणे ही प्रथा ,ही चुकीची रुढीपरंपरा तेव्हाच्या सुज्ञ लोकानी बंद केली म्हणून आपल्याच विधवा आई,मावशी,बहीण  या जिवंत आहेत व ज्यांनी  बंद केली ते आज महामानव म्हणुन अमर आहेत .
मैत्रीणीनो महामानवानी चे सांगीतलय की शिका ,  " संघटीत व्हा अन अत्याचार विरोधात संघर्ष करा." 
खरे देवपण  मुर्ती पुजण्यात नाही ज्याला माणसानेच  तयार केल, माणसानेच घडवल अन माणसानेच  विकल . आपण पैसे देऊन विकत आणलो अन पुजत बसलो . 
पण खरे देवपण ,माणुस पण तर  कर्मातच आहे. संत तुकोबांनी म्हणलेत,
 " जे का रंजले ,म्हणे तयाशी आपुले//
तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा //
याचाही विचार करा अन आंमलात आणा.
आता कुणी म्हणेल की आमच्या भावना दुखावल्या !!! असत्यात कसल्या आल्या भावना खोपडीच्या ???
अन ईथ सत्य जळतय,  जिवंत स्रीच्या भावना दुखावतात त्याच काय ? 
अन जन्म दिलेल्या आईवडीला पेक्षा देव सुद्धा महान नाही .  
नित्य करी आळंदीची वारी अन मायबाप उपाशी उघड्यावरी //
अशाने कधीच देव पावणार नाही हे पण सगळ्यानाच माहीती आहे , ... कळत पण वळत नाही.हे ही खरय पण आता कुठेतरी हे थांबलच पाहीजे असे वाटत नाही  तुम्हाला .??
उघडा डोळे बघा नीट  वाचा विचार करा अन चुकीला प्रतिबंध करा.अन शेवटचे आपल्या सर्व च भगीणीना सोबत घेवुन " हळदी कुंकू कार्यक्रम"  नावानी नाही तर 
" तिळगुळ कार्यक्रम "या नावानी आयोजीत करा . 
--------------------------------------
कालींदी पाटील 
90284 08049

Post a Comment

0 Comments