Ticker

6/recent/ticker-posts

मानोरा खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

मानोरा :-तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूकित एकूण ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १२ जानेवारीला ५१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १३ संचालक अविरोध झाले आहेत.

येत्या २० जानेवारीला खरेदी विक्री संघाची निवडणूक होणार होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १२ जानेवारीला ६४ पैकी ५१ उमेदवारानी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. या बिनविरोध निवडणूकीत सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल पाटील तरोडकर, रुपेश पवार, महादेवराव ठाकरे, मतीन पटेल दादाराव दुमारे भारत चव्हाण, महीला राखीव मतदारसंघातून सौ पदमा प्रविण देशमुख, सौ. सपना विक्रांत देशमुख, मटक्या जाती, जमाती मतदार संघातून गणेश शेषराव पवार, इतर मागासवर्गीय मतदार संघातून धनजय गोविद वानखडे अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून जगदीश किसन वाघमारे, वैयक्तिक मतदार संघातून देवानंद

मोहिते, गणेश मिसाळ असे १३ संचालक बिनविरोध निवडून आले. यावेळी बिनविरोध निवडणूक पार पडल्यानंतर आघाडीचे नेते माजी जि. प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, माजी चिज मंडळ सदस्य अनिल राठोड, माजी बैंक संचालक सुरेश गावडे, जि. प गटनेता उमेश ठाकरे, भाजपा तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष इफ्तेखार पटेल, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र पवार, रा. कॉ. तालुकाध्यक्ष यशवंतराय इंगळे, माजी उपसभापती अभिजित पाटील, प्रविण ठाकरे, जगदीश राठोड, अजय जयस्वाल, सुरेंद्र देशमुख, राजू गुल्हाने, प्रकाश राठोड, राजू नेमाने, गोपाल मोयर, चंद्रकांत देशमुख, प्रविण डाकरे, वसंत राठोड, माणिक डेरे, संजय अलवर, योगेश देशमुख, सुदाम तायडे, असलम पोपटे, हरीश खडकीकर, संतोष कांबळे निळकंठ पाटील, शिंदे शिवसेना गटाचे तालुकाध्यक डॉ. दिपक करडे, राजू ठाकरे, राजू देशमुख, उमेश राठोड, रमेश महाराज आदीसह समर्थकांची उपस्थिती होती. खरेदी विक्री  संघाची स्थापना १९६३ मध्ये झाली होती, तेव्हापासून प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यावर्षी पहिल्यांदाच निवडणूक बिनविरोध झाली आहे. (ता.प्र)

Post a Comment

0 Comments