Ticker

6/recent/ticker-posts

हिंदु, मुस्लीम धर्मात तेढ निर्माण केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल

Washim News : 
मंगरुळपीर ता १६ /(ता प्र) औरंगजेबाचे बॅनर हातामध्ये घेउन हिंदु बांधवांचे मन दुखवेल असे कृत्य केल्याने पोलिसांनी ता १५  रोजी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सतिश हीवरकर वय ४०, रा मानोली रोड मंगरुळपिर यांनी तक्रार दिली की, ता १४ चे रात्री आठ वाजता स्थानिक बिरबलनाथ चौक येथे दादा हयात कलंदर यांच्या दर्ग्यावर चादर चढविण्यासाठी निघालेल्या संदल मिरवणुकीत आरोपीनी औरंगजेब याचे बॅनर ज्यावर हजरत औरंगजेब रहे, अलैह तसेच इतिहास शेरो का लिखा जाता हा चोरो का नही असे लिहीलेले बॅनर हातात उचलुन चौकामध्ये दाखवुन आमचे हिंदु धार्माचे दैवत व श्रध्दा स्थान छत्रपति संभाजी महाराज यांचा अपमान करून तमाम हिंदु बंधवाचे मन दुखवेल असे कृत्य केले आहे. व हिंदू मुस्लीम धर्मा मध्ये तेढ निर्माण केली. अशा जबानी रिपोर्ट वरून आरोपींविरुद्ध कलम २९५ अ,१५३ अ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात दोन आरोपींना अटक केल्याची माहिती ठाणेदार सुनील हुड यांनी दिली असून पुढील तपास  सपोनि तुपार जाधव करीत आहेत.

Post a Comment

0 Comments