मंगरूळपिर/
प्रतिनिधी :- हल्ली वन विभागातील फेऱ्यावर असनारे कर्मचारी हे क्षेत्रातील नागरीकांना वेठीस धरत दिवसाढवळ्या हजोरोंची मागणी करतांना दिसत आहे जर मागणी पुर्ण केल्या गेली नाही तर विविध खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडत असुन,यात एक महीला कर्मचारी या प्रकाराला दुजोरा देत सहभागी असल्याचे मंगरूळपिर येथील तक्रारदार गिरीष परळीकर यांनी विभागात दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.यावर वन विभागातील वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतात की ते ही या भ्रष्ट प्रव्रुत्तीचा सन्मान करत अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठिशी घालतात,याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
वन विभागाला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मंगरूळपिर येथील वर्तुळ अधिकारी श्याम नवलकर, माझे मालकीचे भूखंड 16/2/1 मधील एक वर्षाखालील दोन सागवान झाडे मला बांधकामात अडचण येत असल्यामुळे तोडायची होती याचे ज्ञान नसल्यामुळे मी ती तोडून घेतली व त्या ठिकाणीच राहू दिली त्याचा कुठलाही व्यावसायिक वापर केला नाही अथवा त्या झाडांना कुठेही हलविले नाही. वन विभागाचे व अधिकारी श्याम नवलकर यानी वन विभागाचे विविध कायदे सांगत माझे कडून दहा हजार रुपये घेतले व मी त्यांना पैसे दिले म्हणून कुणालाही सांगितले तर अजून गुन्हे दाखल करीन अशा पद्धतीची धमकी दिली महोदय माझी परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मला वेळेवर धावपळ करुन उधार पैसे आणून दयायचे काम पडले. व अधिकारी श्याम नवलकर व त्यांचे सोबत एक महीला कर्मचारी होत्या या दोघांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत मला धमकी दिल्यामुळे मला मानसिक त्रास झाला व मी त्यांना पैसे दिले.याच दिवशी माझे मालकीचे जागेत सदर झाडांची पाहणी करायला आले असताना श्याम नवलकर यांचे बरोबर एक महिला वनरक्षक सुद्धा होते.तरी महोदय मला न्याय मिळावा व संबंधित वनाधिकान्यावर कार्यवाही व्हावी. मला अशा पद्धतीने लुबाडून श्याम नवलकर वर्तुळ अधिकारी यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पदाचा गैरवापर केला त्यामुळे अशा वना धिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय व्यक्तीवर झालेल्या या ब्लॅकमेलिंगच्या प्रकारामुळे मी बरेच दिवस अस्वस्थ होतो. त्यामुळे मी ही तकार आज करीत आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाला जर आज वाचा फोडली गेली नाही तर माझ्यासारख्या अनेक लोकांवरही असा अन्याय होत राहील व वनविभागाची गरिमा धोक्यात येईल. करिता आपण योग्य ती चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी ही विनंती.असे वन विभागाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे
0 Comments