Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याध्यापकाला जीवे मारण्याची धमकी , पोषण आहार शाळेत उतरविन्या संदर्भात वाद घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी,

पाळोदीच्या मुख्याध्यापकांचे पोलिसांकडे निवेदन 

     मुख्याध्यापकाला जीवे 
         मारण्याची धमकी

मानोरा तालुक्यातील
पाळोदीच्या वसंतराव नाईक विद्यालय
आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाकडून आलेले शालेय पोषण आहार शाळेत उतरवित असताना शाळेतील काही निलंबित कर्मचारी व इतरांनी शाळा परिसरात दहशत निर्माण करून पोषण आहार
गाडी चालकास धान्य इतरत्र उतरविणे संदर्भात धमकी दिल्याचे लेखी निवेदन शाळेच्या प्राचार्यांनी आसेगाव पोलीस स्टेशन कडे करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली- आहे. 
भोपीसिंग हरी आडे, अरविंद किसन चव्हाण (निलंबित शिक्षक; ) आणि वनराज गुलाब, राठोड मनोहर बळीराम राठोड, नारायण दगडू सिंग जाधव यांनी काही अनोळखी व्यक्तींना. शाळेत आणून शालेय पोषण आहाराचा माल शाळेत उतरवित असताना मालवाहू मोटार चालकास शालेय पोषण
'आहाराचे' धान्य नारायण दगडूसिंग जाधव यांचे कडे टाक असे 'सांगितल्यावर हे पोषण आहार कुणाही खाजगी व्यक्तीसाठी नसून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असल्याचे शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने मी सांगितले असता मला शिवीगाळ, धक्काबुक्की करून उपरोक्त  अर्जदार आणि "इतरांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्राचार्य वसंत चव्हाण यांनी. निवेदनामध्ये नमूद केले आहे.
शाळा परिसरात एकेकाचे मुडदे पाडतो, तू शाळा कशी चालवितोस ते तू पाहतो, तू जिवंत कसा राहतो ते
• पाहतो, तू जास्त माजला आहेस का, तुला नोकरी करायची नाही का अशाही धमक्या भोपासिंग आडे जोरजोराने देत होता हे सर्व नारायण दगडू सिंग जाधव यांच्या चिथावणीने देत असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात नमूद करून उपरोक्त आरोपी आणि इतर व्यक्तींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून गुंडागर्दी आणि 'दहशत माजविल्याने सदरील पोषण आहार चालकाने धान्यसाठा शाळेत न उतरविता परत नेल्याने उपरोक्त व्यक्तींमुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहिल्याने ह्या बेकायदेशीर कृत्य
करणाऱ्या विरोधात कायदेशीर
कारवाईची मागणी वसंतराव नाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आसेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याच्या हेतूने केलेल्या कृत्या प्रकरणी पोलीस कारवाई करणार का याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

Post a Comment

0 Comments