मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनात पोलिस दिनानिमित्त वाशीम जिल्हा पोलिस दलात दि.०२.०१.२०२३ ते दि.०८.०१.२०२३ पावेतो रझांग डे' सप्ताह आयोजित करण्या आला आहे. त्यानिमित्ताने पोलीस अधीक्षक कार्यालय वाशीम येथे शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरीता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वाशिम शहरातील जवाहर नवोदय विद्यालय, श्री शिवाजी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, पोहार इंटरनॅशनल स्कूल व गुलशन मिलीया इंग्लिश स्कूल, वाशिम या शाळा/महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
पोलीस अधिक्षक कार्यालय, वशिम येथे शालेय विद्यार्थ्याना पोलीस आणि जनता सुसंवाद, सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती कायदेविषयक सल्ला, महिला व बालकांच्या अत्याचार संबंधी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता उपाययोजना व जनजागृती विषयक कार्यशाळा, अत्यावश्यक मदतीसाठी डायल 112 संदर्भात माहिती देण्यात आली. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे पालन करणेबाबत जनजागृती, आधुनिक शस्त्रांची माहिती व जलद प्रतिसाद याचे प्रात्यक्षिक कार्य, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे विविध शाखांमध्ये चालणारी दैनदिन कामकाज याबाबत माहिती देण्यात आले. यावेळी शाळा व महाविद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी पोलिसांबद्दलची त्यांची पूर्वीची पूर्वग्रहदूषित धारणा व आता पोलिसांशी प्रत्यक्ष संवाद साधून व पोलिसांच्या जीवनाचा / कामकाजाचा जवळून अनुभव घेऊन त्यांची बदललेली सकारात्मक धारणा यावर भाष्य केलं. स्वतः मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये चौका-चौकांमध्ये PR VAN च्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे व पोलीसांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करणारे चलचित्र दाखवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. वाशिम पोलीस दलातर्फे तयार करण्यात आलेले 'निर्भया लागली लढायला' हे सी- सक्षमीकरणावर प्रकाश टाकणारे पथनाट्य ग्राम ईलखी येथे सादर करण्यात आले. सदर सप्ताहामध्ये वाशिम जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक कार्यालय, १३ पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखा, जिल्हा वाहतूक शाखा, निर्भया पथक, दहशतवाद विरोधी पथक अंतर्गत वेगवेगळ्या केळी स्वतंत्र कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. पोलीस झगड़े सप्ताहाचे आयोजन मा.पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम, श्री सारंग नवलकार,
पोलिस उपअधीक्षक (गृह), श्री मांगीलाल पवार, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पोउपनि स्वाती
इथापे म.न.नि. कक्ष, पोका, विठ्ठल सुर्वे स्था गु.शा. मघोना, बेबी राठोड, स्पोक राणी तायडे कल्याण शाखा व
सर्व पो. स्टे प्रभारी अधिकारी मेहनत घेत आहेत.
0 Comments