☘️ पत्रकार दिन ☘️
🌸🌸🌸🌸🌸
कालिंदी ताई पाटील
आपण सर्वानाच माहीत असेल की लोकशाहीची चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकार...
सर्व पत्रकारांचा आजचा दिवस विशेष आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने '☘️पत्रकार दिन'☘️ हा 6 जानेवारीला घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. जुलै 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. जगाच्या प्रत्येक कोनातील इत्यंभुत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार बांधव गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. आपली तहानभूक विसरुन पत्रकार बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता देशातील प्रत्येक घडामोडीबद्दल सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात. अशा या धाडसी पत्रकारितेला आणि हे काम अगदी निष्ठेने पार पाडणा-यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस.💐💐💐
पत्रकारांसाठी विशेष समजल्या जाणा-या या दिवसाच्या आपल्या समस्त पत्रकार बांधवांना खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
व महीला परिवर्तन साठी ,महीलांच्या सर्वागीन विकासात्मक कार्याला प्रसिद्धी देवून व प्रतेक क्षेत्रातील महीलाचा प्राधान्याने विचार करतील हीच अपेक्षा..धन्यवाद 💐💐
कालींदी पाटील
महाराष्ट्र महीला विकास मंच यांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या
0 Comments